1. इतर बातम्या

शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना, ८० टक्के अनुदानासह मिळेल दमदार नफा

शेतकऱ्यांच्या विकासाठी सरकार विविध योजना राबवत असते. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्यही देते. जेणेकरून बळीराजाला शेतीसाठी आवश्यक साधने वेळेवर मिळू शकेल.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


शेतकऱ्यांच्या विकासाठी सरकार विविध योजना राबवत असते.  शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी  सरकार शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्यही  देते. जेणेकरून बळीराजाला शेतीसाठी आवश्यक साधने वेळेवर मिळू शकेल.  दरम्यान सरकार आता शेतकऱ्यांसाठी (Farm Machinery Bank)  फार्म मशीनरी बँक घेऊन येत आहे. या योजनेमुळे  शेतकऱ्यांना शेती करणे अधिक सोपे जाईल.

काय आहे फार्म मशीनरी योनजा

शेती म्हटलं की, मेहनतीचे काम, यंत्राशिवाय शेती करणे आता अशक्य आहे.  परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना अवजारे घेणे , यंत्र घेणे शक्य नसते.  ही बाब लक्षात घेऊन सरकारने गावा - गावात फॉर्म मशीनरी बँक स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे.  यासाठी सरकारने वेबसाइट, मोबाईल एपच्या माध्यमातून गटांची स्थापना करत आहे. 

सरकार देणार ८० टक्के अनुदान

दरम्यान नव तरुण फॉर्म मशीनरी बँक सुरू करुन नियमित आणि चांगले उत्पन्न मिळवू शकतात. फॉर्म मशीनरीसाठी  सरकार ८० टक्के अनुदान देत आहे.  देशभरात सरकार कस्टम हायरिंग सेंटर' (Custom Hiring Centre) बनविण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.  दरम्यान आतापर्यंत ५० हजार पेक्षा जास्त कस्टम हायरिंग सेंटर बनविण्यात आले आहे.  फॉर्म मशीनरी बँकसाठी शेतकऱ्यांना फक्त २० टक्के पैसा गुंतवा लागणार आहे.  गुंतवणुकीत लावण्यात आलेला पैशातील ८० टक्के अनुदानाच्या रुपातून परत येत असतो.  दरम्यान देण्यात येणारे अनुदान हे  १० लाखापासून ते एक कोटी रुपयांपर्यंत दिले जाईल.

 

तीन वर्षात फक्त एकदा मिळेल अनुदान

शेतकरी आपल्या फॉर्म मशीनरी बँकेत सीड फर्टिलाइजर ड्रिल, नांगर, थ्रेसर, टिलर, रोटावेटर, सारख्या मशीन्स अनुदानावर खरेदी करु शकतो. कृषी विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या या योजनेचे अनुदान तीन वर्षातून  एकदा दिले जाणार आहे. एका वर्षात शेतकरी विविध यंत्रांवर अनुदान घेऊ शकेल. 

फार्म मशनरी योजनेसाठी कसा कराल अर्ज

फार्म मशीनरी बँकेसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.  या बँकेसाठी आपल्या परिसरातील ई-मित्र कियोस्कवर एक निश्चित केलेले शुल्क देऊन अर्ज करावे लागते.  अनुदानासाठी एका अर्जासह फोटो, मशीनरीचे बील, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, पासबुकची फोटो कॉपी आदी कागदपत्रे द्यावी लागतात.

 

English Summary: Government's new scheme for farmers, with 80 per cent subsidy will get huge profits Published on: 08 September 2020, 06:51 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters