1. इतर बातम्या

सोलरपंप, विहीर व बोरवेल वर मिळणार 100% वितरीत निधी; जाणून घ्या पात्र लाभार्थ्यांनी विषयी

राज्यातील अनुसूचित जाती व जमातींना शंभर टक्के अनुदानावर विहीर व बोरवेल साठी निधी मिळणार आहे. या अनुदानाचा शंभर टक्के अनुदानावर पाच एचपी च्या सोलर पंपाच्या माध्यमातून विजेची जोडणी या योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण जीआर 26 ऑगस्टला घेतला गेला आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
borewell distributed grant

borewell distributed grant

 राज्यातील अनुसूचित जाती व जमातींना शंभर टक्के अनुदानावर विहीर व बोरवेल साठी निधी मिळणार आहे. या अनुदानाचा शंभर टक्के अनुदानावर पाच एचपी च्या सोलर पंपाच्या माध्यमातून विजेची जोडणी या योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण जीआर 26 ऑगस्टला घेतला गेला आहे.

 या लेखात आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करावी? कोणते लाभार्थी यासाठी पात्र असतील? गोष्टींची माहिती या लेखात घेणार आहोत.

 आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासींच्या विकासासाठी अनेक प्रकारचे महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात. अशा योजनांच्या माध्यमातून  आदिवासींना मुख्य समाजप्रवाहात आनने हा शासनाचा उद्दिष्ट आहे.

त्याअनुषंगाने आदिवासी जमातीतील शेतकऱ्यांना शाश्वत शेतीसाठी सिंचनाच्या आधुनिक सुविधा पुरवून शेती उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने तसेच शेतीला पाणीपुरवठा करण्याकरता शेतात विहीर किंवा बोरवेल च्या माध्यमातून शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सोलर पंप बसवणे या दृष्टिकोनातून या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांची मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेसाठी एकूण 18 कोटी निधी वितरित करण्यात आला होता. या वितरित निधीच्या अधीन राहून ही योजना राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत.

या योजनेचा कालावधी किती असेल?

या योजनेचा कालावधी हा एक वर्षाचा असणार आहे. या योजनेअंतर्गत विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत सन 2015 -16 करिता मंजूर रुपये अठरा कोटी

 योजनेचे लाभार्थी – आयुक्त आदिवासी विकास, नाशिक यांच्याकडून प्रकल्प कार्यालय निहाय  ( वन पट्टे वाटप झालेल्या प्रकल्पांतर्गत ) लक्षांक निश्चित करण्यात येतील.

 या योजनेद्वारे मिळणारा लाभ

  • बोरवेल/डगवेल – 2 लाख 50 हजार रुपये
  • सोलर पंप ( पाच एचपी ) दोन लाख 33 हजार रुपये

 

या योजनेसाठी कराव्या लागणाऱ्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थ्यांचा  रहिवाशी दाखला
  • लाभार्थ्याच्या जातीचा दाखला
  • वन हक्क कायद्याद्वारे वन पट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र
  • यापूर्वी सदर योजनेचा लाभ आदिवासी विकास विभागामार्फत घेतला नसल्याचे प्रमाणपत्र
  • विहीर व बोरवेल प्रस्तावित असलेल्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याचे भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे प्रमाणपत्र
  • विधवा महिला शेतकरी, अपंग शेतकऱ्यांना प्राधान्य देणे बाबत समिती निर्णय घेणार आहे

 

शासन निर्णयाप्रमाणे ज्याविहिरीचे काम पूर्ण झाले आहे व तसे प्रमाणपत्र संबंधित यंत्रणेकडून सादर केल्यावर लाभार्थ्यांना सोलर पंप पॅनल  चा लाभ घेता येणार आहे.

English Summary: distibuted grant for wall,borewell and solar pump Published on: 28 August 2021, 12:21 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters