1. इतर बातम्या

CNG GAS; सीएनजीच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ, लवकरच गाठणार शंभरी?

आता देशात सीएनजीच्या किंमतीत (CNG Price Hike) पुन्हा वाढ झाली आहे. सीएनजीच्या किंमतीतील ही वाढ 2 रुपयांनी करण्यात आली आहे. मुंबईत आजचे सीएनजीचे दर हे 76.00 रुपयांवर होते, ते आता आणखी दोन रुपयांनी वाढणार आहेत.

Big increase in CNG prices again

Big increase in CNG prices again

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढत चालली आहे. असे असताना आता यामध्ये अजून भर पडणार आहे. घरगुती गॅस सिलिंडर आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती या महिन्यात वाढल्या आहेत. 50 रुपयांच्या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत आता 999.5 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईतही या सिलिंडरची किंमत 999.5 रुपयांवर पोहोचली आहे. कोलकात्यात त्याची किंमत 1026 रुपये आहे.

असे असताना आता देशात सीएनजीच्या किंमतीत (CNG Price Hike) पुन्हा वाढ झाली आहे. सीएनजीच्या किंमतीतील ही वाढ 2 रुपयांनी करण्यात आली आहे. मुंबईत आजचे सीएनजीचे दर हे 76.00 रुपयांवर होते, ते आता आणखी दोन रुपयांनी वाढणार आहेत. त्यामुळे सीएनजीवरील वाहनधारकांच्या खिशावर याचा भार पडला आहे. देशात सर्वसामान्य महागाईने (Inflation) बेजार झाला असाताना आता खिशावरचा फार आणखी वाढला आहे.

मुंबई पेट्रोलचा दर 120 रुपये लीटर आहे. तसेच डिझेलचा दर 105 आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 120 रुपयांच्या दरम्यान असून डिझेलचही शंभरीच्या पार जाऊन बरेच दिवस झाले आहे. त्यात आता सीएनजी आणख दोन रुपयांनी वाढल्याने आता चिंता वाढली आहे. यामुळे लवकरच श्रीलंकेसारखी परिस्थीती भारताची होणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

तसेच मे महिन्याच्या पहिल्या दिवशी 10 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. मोठ्या शहरांमध्ये त्याच्या किंमतीत 104 रुपयांपर्यंत वाढ नोंदवली गेली. यापूर्वी मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडर महाग झाला होता. 22 मार्च रोजी 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली होती.

याचे कारण म्हणजे कच्च्या तेलाचा वापर केवळ पेट्रोल आणि डिझेल बनवण्यासाठीच नाही तर दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्‍या 2 हजारांहून अधिक वस्तूंच्या निर्मितीमध्ये कच्चा माल म्हणून केला जातो. कच्च्या तेलाच्या सध्याच्या किमती केवळ भारतासाठीच नाही तर जगातील सर्व देशांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे.

महत्वाच्या बातम्या;
दुग्ध व्यवसायासह पशुधन देखील अडचणीत; आता शेतकरी आणखी खोलात
गाय आणि म्हशीच्या कानातील 'आधार कार्ड' टॅगमुळे शेतकऱ्यांचा फायदा! मिळतो 'या' योजनांचा फायदा..
टाटा मोटर्स करणार धमाका! 'या' दिवशी करणार 400 किमी रेंज असलेली स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च..

English Summary: CNG GAS; Big increase in CNG prices again, will soon reach 100? Published on: 15 May 2022, 10:20 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters