1. इतर

पीएम किसान योजनेत झाला मोठा बदल; या कागदपत्राशिवाय नाही मिळणार पैसे

केंद्र सरकार देशभरातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी योजनाही राबविल्या आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि त्यांचे उत्पन्नही दुप्पट होऊ शकेल. अशाच एका योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना). मात्र अलीकडेच केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.

पीएम किसान योजनेतेली सर्वात मोठा बदल (Big change in PM Kisan Yojana)

वास्तविक, पीएम किसान योजनेच्या नोंदणीमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकारी दस्तऐवज अनिवार्य करण्यात आले आहे. या सरकारी कागदपत्राचे नाव रेशन कार्ड. होय, आता रेशनकार्ड क्रमांक आल्यानंतरच पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच, आता या योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करताना रेशनकार्ड क्रमांक देणे बंधनकारक आहे (रेशन कार्ड अनिवार्य). या दस्तऐवजाची सॉफ्ट कॉपी तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल.

आता ही कागदपत्रे पीएम किसान योजनेत द्यावी लागणार 


जर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोंदणी केली तर तुम्हाला रेशनकार्ड क्रमांक देखील अपलोड करावा लागेल. यासोबतच पीडीएफही अपलोड करावी लागणार आहे. म्हणजेच आता सातबारा दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता कागदपत्राची PDF फाईल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल. अशा प्रकारे पीएम किसान योजनेत होणारी फसवणूक कमी करता येईल, असा सरकारचा विश्वास आहे. त्यामुळे नोंदणीची प्रक्रिया सोपी होणार आहे.

 

या तारखेला येईल हप्ता

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सरकारने पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता जारी करण्याची तारीख निश्चित केली आहे. हप्त्याचे हस्तांतरण करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्याचा लाभ मिळू शकेल.
सरकारने 15 डिसेंबर 2021 पर्यंत पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता जारी करण्याचा विचार करत आहे. तर मागील वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी हप्ता हस्तांतरित करण्यात आला.

शेतकऱ्यांना वर्षाला मिळतात ६ हजार रुपये

पीएम किसान योजनेअंतर्गत कोट्यवधी शेतकर्‍यांना दरवर्षी 6000 रुपये हस्तांतरित केले जातात. ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात ऑनलाइन वर्ग केली जाते. तुम्ही देखील पात्र शेतकरी असाल आणि या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नसाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही PM किसान योजनेत तुमचे नाव नोंदवून देखील लाभ घेऊ शकता.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters