निफाड तालुक्यातील उसाचे कारखाने गेले ५ ते ७ वर्षांपासून बंद आहेत त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत एक वेगळाच प्रयोग केला आहे ते बघून सर्व जण थक्क झाले आहेत. निफाड मधील शेतकऱ्यांनी उसाच्या शेतीला फाटा देऊन फुलकोबी म्हणजेच फ्लॉवरची शेती केली आहे आणि त्यामधून त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न भेटत आहे.
शेतकऱ्यांनी ८० रुपये दराने फ्लॉवर ची १६ हजार रोपे आणून एक एकरात लागवड केली त्यामध्ये ३० हजार खर्च करून ड्रीपच्या साहाय्याने त्या रोपांना पाणी दिले. रोपांची चांगली वाढ झाली आणि दीड ते दोन महिन्यात फ्लॉवर चे पीक हातात आले.
दीड लाख उत्पन्नाची अपेक्षा:
नाशिकच्या बाजारात फ्लॉवर ला मोठी मागणी आहे तसेच तिथे १ फ्लॉवर १५ रुपये दराने विकला जातो. प्रति एकर ५० हजार फ्लॉवर च्या शेतीला खर्च करून त्याच शेतीमधून शेतकरी दीड लाखाचे उत्पन्न घेत आहेत. शेतीमध्ये सर्व झालेला खर्च वजा केला तर निफाड मधील शेतकऱ्याला दोन ते तीन महिन्यात एक लाख रुपयांचा नफा भेटत आहे.
हेही वाचा:फळबागांसाठी कोण- कोणत्या आहेत शासनाच्या योजना, जाणून घ्या
ऊस शेतीला फाटा:
नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो जसे की इगतपुरी, त्रंबकेश्वर आणि दिंडोरी हे तीन तालुके. पावसाचे पाणी गोदावरी नदी, दारणा नदी व कादवा नदी मधून निफाड मध्ये असलेल्या एका धरणात जाते त्यामुळे त्या गावातील शेतकरी उसाची शेती करत होते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे निफाड तालुक्यात निफाड सहकारी साखर कारखाना व रानवड सहकारी साखर कारखाना या दोन्ही कारखान्यांची स्थापना केली गेली परंतु मागील पाच ते सात वर्षांपासून तिथे पाऊस च पडला नसल्याने शेतात उसाचे पीक घेणे अशक्य होऊ लागले त्यामुळे तेथील कारखाने सुद्धा बंद पडले.
मग तेथील शेतकऱ्यांनी उसाला दुसरा पर्याय काढत फुलकोबी म्हणजेच फ्लॉवर ची शेती करायला सुरुवात केली आणि त्यामधून त्यांना मोठया प्रमाणात उत्पन्न भेटू लागले. भुसे, चापडगाव मधील शेतकरी मोठ्या प्रमाणात फ्लॉवर च्या शेतीतून फायदा काढत आहेत.
Share your comments