1. इतर बातम्या

Horoscope 23 August: मंगळवार या राशींसाठी आहे शुभ; मिळेल आनंदवार्ता

दैनिक राशिफल (Daily Horoscope) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे. ज्यामध्ये सर्व राशींचे तपशीलवार वर्णन केले आहे. या राशी बद्दल जाणून घेऊया..

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम

दैनिक राशिफल (Daily Horoscope) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे. ज्यामध्ये सर्व राशींचे तपशीलवार वर्णन केले आहे. या राशी बद्दल जाणून घेऊया..

मेष

आजचा दिवस मेष राशीच्या लोकांचा कोणत्याही नवीन उपक्रमासाठी उत्तम काळ आहे. तुम्ही बहुतांश उपक्रम यशस्वीपणे हाताळण्यास सक्षम असणार आहात.

वृषभ

वृषभ राशीच्या (Taurus) लोकांच्या कौटुंबिक जीवनात अस्थिरता येण्याची शक्यता आहे. तुमचं तुमच्या पालकांशी काही वैचारिक मतभेद असू शकतात. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे.

मिथुन

मिथुन राशीची लोक या काळात तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असतील. व्यवसायाचा विस्तारही होऊ शकतो. तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे.

कर्क

आज तुमची चांगली कामगिरी इतरांना प्रभावित करेल. तुम्ही तुमच्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त काही करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला त्यात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस निराशाजनक असू शकतो.

सिंह

ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा भावनिक सहभाग (emotional involvement) आणि लांबचा प्रवास टाळावा. कुटुंबातील सदस्यांमधील अस्वस्थता तुमच्यासाठी चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

Farmers Subsidies: शेतकऱ्यांना गोदाम बांधण्यासाठी मिळणार 12 लाख रुपये अनुदान

कन्या

आज तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या खूप यशस्वी व्हाल. तुम्हाला आरोग्य चांगलं राहणार आहे. शिवाय तुमचा आत्मविश्वासही खूप वाढेल.

तूळ

आज तुम्ही तुमच्या संपर्कांमुळे व्यवसाय आणि व्यावसायिक संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल.

वृश्चिक

या सोमवारी तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही गोंधळलेल्या स्थितीत असाल आणि ही परिस्थिती तुम्हाला वेळेवर काम पूर्ण करण्यापासून रोखू शकते.

Animal Disease: जनावरांमधील संसर्गजन्य आजारावर करा वेळीच उपचार; जनावरे दगावणार नाहीत

धनू

आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांना तुमचं मन सांगू शकाल. यावेळी तुमच्या युक्तीने तुम्हाला कुटुंबियांकडून मदत मिळू शकेल.

मकर

आजच्या दिवशी तुम्ही थोडे चिंतेत राहण्याची शक्यता आहे. तुम्ही अनावश्यक गुंतागुंतीमध्ये अडकू शकता. आर्थिक समस्या (Financial problems) सोडवण्यासही थोडा वेळ लागू शकतो.

कुंभ

आज तुमच्यापैकी काहींना आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर प्रवास होऊ शकतो. कौटुंबिक वातावरणातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कुटुंबातील सदस्य तुमच्या यशाचा पूर्ण आनंद घेऊ शकणार नाहीत.

मीन

आज मीन राशीच नशीब चांगलं असून तुम्ही सर्व कामं उत्तम कराल. नोकरदार लोकांना कोणतंही विशेष काम यश मिळवून देऊ शकतं. परदेशी संपर्क असलेल्या लोकांना अचानक लाभ होईल आणि प्रवासही होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या 
Weed Control: असे करा मका, सोयाबीन, कापूस, ज्वारी, पिकांमधील तणाचे नियंत्रण
दुभत्या जनावरांचे दूध वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय; कमी खर्चात होईल जास्त नफा
जनावरांमध्ये स्पायडर लिलीची विषबाधा; करा वेळीच उपचार, अन्यथा होईल मोठे नुकसान

English Summary: zodiac sign supported luck today horoscope Published on: 22 August 2022, 06:34 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters