ज्या देशांमध्ये रेशन दुकानात दोन तीन रुपये किलोने धान्य मिळत असेल आणि तेच धान्य दहा रुपये किलोने विकले जात असेल तर काम करायची काय गरज.अजून थोड्याच दिवसांनी असे प्रकार प्रत्येक मार्केट यार्ड मध्ये पाहायला मिळतील त्याला कारणही तसे आहेत थांबायला कुणीच तयार नाही मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत आहे आणि तो दिवसेंदिवस वाढत जाणार.बी, बियाणे ,खते ,औषधे याच्यासाठी प्रत्येक कंपनी मार्केटिंग करत आहे शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी रोज नवीन नवीन पद्धतीने मार्गदर्शन करणे चालू आहे उत्पन्न वाढीचा परिणाम हा सरळ सरळ शेतकऱ्याच्या मुळावर होत आहे पण हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही
कारण त्याच्याजवळ पैसा आहे (कर्ज काढून) पैसा आहे म्हणून त्याने स्पर्धा लावली स्पर्धा आपल्या शेतकरी मित्रांसोबत स्पर्धेने खर्च वाढला खर्चाने जगाच अर्थ चक्र फिरू लागले शेतकऱ्यांचं नाही हे आपल्या लक्षात येतच नाही खर्च वाढला तर उत्पन्नही वाढलं त्याचा परिणाम शेतकऱ्यावरती झाला.मार्केटमध्ये मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला तुमच्या उत्पन्न वाढीच्या नादाने जगाचा अर्थ चक्र व्यवस्थित फिरत आहेत असं त्याला इथून पुढील काळात फिरवत राहु कारण आपल्याला जगाचा पोशिंदा म्हणतात आणि आपलं कार्य आपण प्रामाणिकपणे करत राहू
आणि बळीराजा म्हणून स्वतःचा बळी देत राहूया कृषिप्रधान देशातील व्यवस्थेने देशातील शेतकऱ्यालाही रेशन दुकानाच्या लाईन मध्ये उभे केले आहे याचा अर्थ असा होतो आम्ही देशातील शेतकऱ्यालाही पोसतो.आणि आज प्रत्येक गावांमध्ये रेशन आल्यानंतर रेशन वाटप केलं जातं आणि तेच रेशन दहा रुपये किलोने प्रत्येक ग्राहक विकतो मुळात हे रेशन खायला कोणी तयार नाही तरीही आपण रेशन घेऊन ते विकत असतो म्हणजे खालून वरपर्यंत जो भ्रष्टाचार आहे त्यात आपणही सामील आहोत असाही त्याचा अर्थ होतो.आणि शेतकरीही लाखो चा माल हजारात विकून मोकळा होतो त्याकडे तो दुर्लक्ष करतो आणि रेशन
अनुदान लाल्या रोग दुष्काळी अनुदान याच्याकडे शेतकऱ्यांचे जास्त लक्ष असते तुकड्यावर जगायची सवय लागून गेली आहेत या कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांना.पण आता चा खूप मोठा तरुण वर्ग जो शिक्षित आहे तो शेती करत आहे आधुनिक पद्धतीने शेती पिकवत आहे आधुनिक च्या नादात खर्च तर वाढलाच उत्पन्नही वाढले पण उत्पन्न आणि खर्चाचा मेळ लागत नाही याला जबाबदार कृषिप्रधान देशातील व्यवस्था बाजारपेठ जुन्या पद्धतीने चालू आहे निदान या तरुणांनी यांच्या शिक्षणाचा उपयोग आपल्यावर अन्याय होतो यासाठी तरी करायला यात काही चुकीचं बोललो असेल तर क्षमा असावी वर जे काही बोललो ते मलाही लागू होते.
Share your comments