विविध प्रकारची कागदपत्रे आणि आपले दैनंदिन जीवन आणि त्यातील बरीचशी कामे यांचे एक मोठे घनिष्ठ नाते आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कुठल्याही कामासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे म्हणजे समोर असलेल्या जिवंत माणसापेक्षा जास्त महत्वाचे आहेत की काय असा प्रश्न पडतो. आपलाच आयडी प्रुफ देण्यासाठी आपल्याला कागदपत्रे द्यावी लागतात. असो हे सरकारी नियम आहेत त्यानुसार आपल्याला वागावे लागते.
नक्की वाचा:PM Kisan: सावधान! उरले फक्त 2 दिवस; करा हे काम अन्यथा मिळणार नाहीत पीएम किसानचे पैसे
परंतु काही कारणामुळे जर आपल्याकडे कागदपत्र नसेल तर त्याच्यामुळे आपले कितीही महत्त्वाची काम असेल तरी ते अडकू शकते. निवडणूक मतदानासाठी मतदान कार्ड हे तेवढेच आवश्यक आहे. कारण आपला बहुमोल मतदानाचा हक्क हा मतदान कार्डवर अवलंबून आहे.
समजा तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल आणि तुम्हाला जर ते नवीन काढायचे असेल तर प्रत्येकाला नकोसे वाटणारे सरकारी कार्यालयातील चक्कर आपल्याला मारावेच लागतात. तासनतास रांगेत उभे राहावे लागते. परंतु आपण या लेखात ऑनलाइनच्या माध्यमातून घरबसल्या मतदान कार्ड मिळवायची पद्धत आपण जाणून घेणार आहोत.
ऑनलाईन अर्ज
1- यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्या ठिकाणी असलेल्या होमपेजवर 'नॅशनल वोटर्स सर्विसेस' या पोर्टल वर क्लिक करावे.
2- त्या ठिकाणी असलेल्या 'अप्लाई ऑनलाइन' या विभागामध्ये नवीन मतदार नोंदणी वर क्लिक करावे.
3- या ठिकाणी असलेल्या फॉर्म 6 डाउनलोड करावा आणि त्यात व्यवस्थित माहिती भरून नंतर सबमिट करावा.
4-त्यानंतर तुमच्या जो काही ई-मेल आयडी असतो त्यावर लिंक येते. या लिंकच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या वोटर आयडी अर्थात मतदार ओळखपत्राची तुमची स्टेटस सहजपणे पाहू शकतात.
5- या पद्धतीने तुम्ही अर्ज केला तर अगदी दहा दिवसाच्या आत बाहेर तुमचे मतदार कार्ड अगदी घरबसल्या तुम्हाला पाठवले जाते.
Share your comments