1. इतर बातम्या

वा! फक्त दहा हजार रुपयात करा हा व्यवसाय सुरू आणि कमवा महिन्याला लाखो रुपये

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे लोकांचा खासगी नोकरीवरचा विश्वासच उडालाय.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
वा! फक्त दहा हजार रुपयात करा हा व्यवसाय सुरू आणि कमवा महिन्याला लाखो रुपये

वा! फक्त दहा हजार रुपयात करा हा व्यवसाय सुरू आणि कमवा महिन्याला लाखो रुपये

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे लोकांचा खासगी नोकरीवरचा विश्वासच उडालाय. त्यापेक्षा छोटा का असेना, पण ‘गड्या, आपला धंदाच बरा. असं अनेकांना वाटतंय.पण कोणताही व्यवसाय सुरु करायचा, म्हणजे गाठीशी दोन पैसे लागतातच.पण, अगदी कमी भांडवलातही तुम्ही तुमचा स्वत:चा व्यवसाय सुरु करु शकता.. शिवाय, बॅंका मदतीला आहेतच की.. चला तर मग अशाच अगदी कमी पैशांत सुरु करता येणाऱ्या व्यवसायाबाबत जाणून घेऊ या मुंबईत एक संस्था आहे.‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ अर्थात ‘सीएमआयई’ असं या संस्थेचं नाव. या संस्थेनं भारतीय श्रम शक्तीसंदर्भातील नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केलाय. 

त्यातील धक्कादायक बाब म्हणजे, योग्य नोकरी मिळत नसल्याने अनेक भारतीय तरुणांनी आता नोकरीचा नादच सोडल्याचं समोर आलंय.

जाणून घ्या हा व्यवसाय

खरं तर हा हंगामी व्यवसाय आहे. तो म्हणजे, मच्छरदाणीचा.. वर्षातील 7-8 महिने मच्छरदाणीला मोठी मागणी असते. खास करुन उन्हाळा नि पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढते. अशा काळात ग्राहकांकडून मच्छर दाण्यांना चांगली मागणी असते. ही मागणी तुम्ही स्थानिक पातळीवरही पूर्ण करु शकता.

मच्छर दाणीचे साधारण दोन प्रकार आहेत. एक म्हणजे कॉटन नि दुसरा सिंथेटिक. 

सिंगल बेड व डबल बेड मच्छर दाण्यांना बाजारात मोठी मागणी असते. शिवाय लहान मुलांसाठीही वेगवेगळ्या डिझाइनमध्ये मच्छर दाण्या विकल्या जातात.

फक्त इतका येईल खर्च

मच्छर दाणी तयार करण्यासाठी नेट आणि धागा हाच मुख्य कच्चा माल आहे. घाऊक बाजारात तुम्हाला 10-12 हजार रुपयांना संपूर्ण नेट रोल मिळू शकतो. एका रोलमध्ये अनेक मच्छर दाण्या सहज तयार होऊ शकतात. घरच्या घरी मच्छर दाण्या तयार करुन तुम्ही त्या बाजारात विकू शकता.

इतकी होईल तुमची कामाई.

सिंगल बेड मच्छर दाणी तयार करण्यासाठी तुम्हाला साधारण 100 रुपयांपर्यंत खर्च येईल. बाजारात ही मच्छरदाणी सहज 300 रुपयांना विकली जाते, तर डबल बेड मच्छरदाणी तयार करण्यासाठी 200 रुपयांपेक्षाही कमी खर्च येतो. नि ही मच्छरदाणी बाजारात 600 ते 700 रुपयांना विकली जाते. म्हणजेच मच्छरदाणी व्यवसायात सहज तीन पट परतावा मिळतो.

शिवाय, महत्वाचं म्हणजे, मच्छरदाणी काही लगेच खराब होणारी वस्तू नाही. त्यामुळं त्यात नुकसानीची जोखीम नाही. तसेच, या सेगमेंटमध्ये ‘ब्रँडेड प्रोडक्ट्स’चं वर्चस्वही नाही.ही तुमच्यासाठी उत्तम बाब आहे. बाजारातील काही दुकानदारांशी संपर्क साधून तुमचं प्रोडक्ट विकता येईल. व्यवसाय वाढविण्यासाठी माल ‘एक्स्पोर्ट’ही करता येईल.

English Summary: Wow only 10000 ruppes do start this business and earn lakh rupees per month Published on: 27 April 2022, 07:12 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters