1. इतर बातम्या

Weekly Horoscope: येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

आज १७ तारखेपासून ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. हा आठवडा सर्वच राशींसाठी अतिशय खास ठरणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ सिद्ध होऊ शकतो. सर्व राशींसाठी आठवडा कसा राहील? जाणून घेऊया.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
horoscope

horoscope

आज १७ तारखेपासून ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. हा आठवडा सर्वच राशींसाठी अतिशय खास ठरणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) काही राशींच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ सिद्ध होऊ शकतो. सर्व राशींसाठी आठवडा कसा राहील? जाणून घेऊया.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात एका लहान प्रवासाची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या आणि तणावाची तसेच, आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारू शकते. धनलाभ होण्याची संभावना आहे.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आरोग्य आणि मनाची स्थिती सुधारू शकतो. कामाचा ताण कमी होण्यासह कर्जातून मुक्त होण्यासही मदत होऊ शकते. पैसा आणि करिअरची स्थिती ठीक राहील. कुटुंबात शांतता आणि संयम ठेवून वाद टाळण्याचा प्रयत्न करावा. या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांची या आठवड्यात आर्थिक स्थिती सुधारू शकते. करिअरमधील (Career) समस्या हळूहळू सुटू शकतात. मात्र कामाचे थोडे दडपण राहू शकते. शिक्षण आणि स्पर्धांच्या बाबतीत कठोर परिश्रम करावे लागतील. आठवड्याच्या शेवटी महत्त्वाच्या प्रवासाची शक्यता आहे.

कर्क

आठवड्याच्या सुरुवातीला तणाव जाणवू शकतो. करिअर आणि नातेसंबंधात अडचणी येण्याची संभावना आहे. मात्र, तुम्ही हुशारीने परिस्थिती हाताळू शकता. आठवड्याच्या मध्यापासून पैसा आणि करिअरची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मात्र एखादी भावनिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते.

कान साफ करण्यासाठी इअरबड्स वापरताय? तर सावधान, पोहचू शकतो धोखा

सिंह

आठवड्याच्या सुरुवातीला लाभाची शक्यता आहे. करिअर आणि कर्जाची स्थिती सुधारू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक सदस्याबाबत काही चिंता सतावू शकते. या आठवड्यात आपला स्वभाव आणि बोलणे सांभाळावे.

कन्या

आठवड्याच्या सुरुवातीला आरोग्य आणि मानसिक स्थिती सुधारू शकते. करिअर आणि पैशातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्ही नवीन कामाचा विचार करू शकता. घाईघाईने काम करणे आणि निर्णय घेणे टाळावे. आठवड्याच्या शेवटी वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करावा.

तूळ

आठवड्याच्या सुरुवातीला प्रवासाचे योग बनत आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि धावपळ वाढू शकते. आरोग्य चांगले राहून धनलाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबाबत समस्या निर्माण होऊ शकतात.

वृश्चिक

या आठवड्यात आरोग्य आणि मानसिक स्थितीकडे लक्ष द्यावे लागू शकते. मात्र, हळूहळू परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. एकूणच करिअरची स्थिती चांगली राहील. सप्ताहाच्या शेवटी वाहन किंवा मालमत्तेचा लाभ होण्याची संभावना आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! फळबाग लागवडीसाठी सरकार देतंय 100 टक्के अनुदान

धनु

आठवड्याच्या सुरुवातीला लाभदायक प्रवास होण्याची शक्यता आहे. व्यस्तता वाढेल, परंतु प्रत्येक परिस्थितीत फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये काही सुधारणा होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक वाद आणि धनहानी यापासून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न करावा.

मकर

आठवड्याच्या सुरुवातीपासूनच मानसिक चिंता दूर होण्याची संभावना आहे. करिअर आणि पैशाची स्थिती सुधारू शकते. नवीन कामांना सुरुवात करू शकता. वाद टाळण्याच्या प्रयत्न करावा.

कुंभ

आठवड्यात कामाचा ताण राहू शकतो. परंतु आठवड्याच्या मध्यापासून स्थिती सुधारू शकते. शैक्षणिक स्पर्धेच्या बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. विवाहाशी संबंधित गोष्टी मार्गी लावण्यासाठी ही योग्य वेळ सिद्ध होऊ शकते.

मीन

आठवड्याच्या सुरुवातीला मन अस्वस्थ होऊ शकते. करिअर आणि कौटुंबिक बाबींमध्ये तणाव वाढू शकतो. आठवड्याच्या मध्यापासून हळूहळू सुधारणा होण्याची संभावना आहे. आरोग्य सुधारू शकते. या आठवड्यात मित्र किंवा शिक्षकाची मदत लाभदायक सिद्ध होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या 
दिलासादायक! पहिल्या टप्प्यात 37 हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ
दूध उत्पादक व कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; वारणा सहकारी दूध संघाकडून मिळणार ५४ कोटी रुपये
पोस्ट ऑफिसमधील FD वर बँकेपेक्षा मिळणार जास्त व्याजदर; जाणून घ्या

English Summary: Weekly Horoscope How coming week complete horoscope Published on: 17 October 2022, 05:38 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters