1. इतर बातम्या

बातमी अतिशय कामाची! तुमच्या आधार कार्डचा कोणीही गैरवापर करत आहे का? तपासा अगदी दोन मिनिटात

आधार कार्ड सगळ्यात आवश्यक कागदपत्र पैकी एक कागदपत्र आहे. कुठल्याही सरकारी कामासाठी आधार कार्डची आवश्यकता भासते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
use thise online process to know misuse to your aadhar card

use thise online process to know misuse to your aadhar card

 आधार कार्ड सगळ्यात आवश्यक कागदपत्र पैकी एक कागदपत्र आहे. कुठल्याही सरकारी कामासाठी आधार कार्डची आवश्यकता भासते.

अगदी शाळेतील प्रवेश असो की कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर अनिवार्य करण्यात आला आहे. आता आपल्याला माहित आहेच की, आधार कार्ड वर स्वतःचे नाव, तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर पासून  फिंगरप्रिंट पर्यंतचेडाटा उपलब्ध असतो. आपल्या बँक खात्याला आधार नंबर लिंक असल्याने आधार क्रमांकाचा गैरवापर करण्याचा धोका देखील तितकाच वाढलेला आहे. तुमच्या आधार क्रमांकाचा कोणी गैरवापर तर करत नाही ना? ही भीती  तुमच्या मनात असेल तर तुम्ही ते अगदी दोन मिनिटात ते तपासू शकतात. युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही तुमचा आधार नंबर केव्हा आणि कुठे वापरला गेला हे ऑनलाईन तपासू शकता. त्यासाठी तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही.

 या लेखामध्ये आपण ही प्रक्रिया जाणून घेऊ.

 या पद्धतीने तपासा तुमच्या आधार कार्डाची स्थिती

1- यासाठी सर्वप्रथम तुम्ही युआयडीएआयच्या udai.gov.in या संकेतस्थळावर जा.

2- यामध्ये आधार सर्विसेस नावाचा एक ऑप्शन तुमच्यासमोर उघडतो. त्याच्या अगदी खाली आधार अथेंतिकेशन हिस्टरी  असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

3- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि एक सुरक्षा कोड दिसेल तो कोड टाकावा आणि सेंड ओटीपी वर क्लिक करावे.

4- त्यानंतर तुमचा आधार कार्ड ची लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. हा आलेला ओटीपी इंटर करावा  व त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे.

5- यानंतर तुम्हाला अथेंतिकेशनचा( प्रमाणीकरण) प्रकार आणि तारीख श्रेणी आणि ओटीपी यासह विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.

6- नंतर व्हेरिफाय ओटीपी वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक यादी येईल. त्यामध्ये तुमचा आधार कार्ड चा वापर केल्यास सहा महिन्यांमध्ये केव्हा आणि कुठे झाला याची माहिती दिली जाईल.

7- यामध्ये महत्त्वाचे असे की या याद्वारे तुम्ही फक्त तुमच्या सहा महिन्यापर्यंतचा डेटा पाहू शकतात.

याबाबतची तक्रार नोंदवू शकता

 जर तुम्हाला आढळून आले की तुमच्या आधार चा गैरवापर झालेला आहे तर तुम्ही टोल फ्री क्रमांक 19 47 वर कॉल करू शकता किंवा help@uidai.gov.in वर ईमेल करून तक्रार नोंदवू शकतात.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Pm Kisan : आता ई-केवायसी करण्यासाठी ही सुविधा झाली सुरु; 2 हजार प्राप्त करण्यासाठी लवकरात लवकर करा ई-केवायसी

नक्की वाचा:Minister Dada Bhuse : कृषिमंत्री दादाजी भुसे यांची कौतुकास्पद 'दादागिरी'!! दादांनी जुगार अड्डा केला उध्वस्त…..

नक्की वाचा:थेंबे थेंबे तळे साचे'उक्तीप्रमाणे बचत आहे महत्त्वाची! म्हणून पोस्टाची ही योजना ठरेल तुमच्यासाठी फायद्याची

English Summary: use thise online process to know misuse to your aadhar card Published on: 26 April 2022, 09:04 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters