1. इतर बातम्या

आजच्या पिढीला हे कळायलाच हवे

लहानपणी सक्तीने एरंडेल पाजले जायचे बुळबुळीत लागले तरी गिळावच लागायचे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
आजच्या पिढीला हे कळायलाच हवे

आजच्या पिढीला हे कळायलाच हवे

नंतर लोटापरेड होणे अनिवार्य असायचे आज उतारवयातही पचनशक्ती उत्तम आहे त्या एरंडेलचे महत्त्व आता जाणवतय (१)लहानपणी पाढे तोंडपाठ करावे लागायचे कविता श्लोक घोकावेच लागायचे सनावळ्यानाही विशेष महत्व असायचे आज उतारवयातही स्मरणशक्ती उत्तम आहे त्या पाठांतराचे महत्त्व आता जाणवतय (२)लहानपणी शाळेत पायी जावे लागायचे कॉलेजसाठी सायकलशिवाय वाहन नसायचे सगळे खेळ पण भरपूर धावपळीचे असायचे आज उतारवयातही अंगकाठी सडसडीत आहे त्या पायपिटीचे महत्त्व आता जाणवतय (३)लहानपणी जेवणात आवड निवड नसायची

वरण, भात, भाजी,आमटी खावीच लागायची ताजे ताक फोडणीच्या पोळीचीही सक्ती व्हायची आज उतारवयातही भूक बीपी शुगरचा त्रास नाही त्या चौरस आहाराचे महत्त्व आता जाणवतय (४) लहानपणी तिन्हीसांजेला सायंप्रार्थना असायची पंधरावा अध्याय म्हणायची सक्ती व्हायची रामरक्षा ,भीमरुपापासून तर सुटकाच नसायचीआज उतारवयातही मन अत्यंत निर्भय आहे त्या भीमरूपीचे महत्त्व आता जाणवतय (५)लहानपणी खोटे बोलायची शामत नसायची फुकटचे काही घेतले तर शिक्षाच व्हायची उधारी-उसनवारी लाजीरवाणी वाटायची आज उतारवयातही स्वाभिमानाने जगतो आहे 

त्या शिकवणीचे महत्त्व आता जाणवतय (६) लहानपणी अभ्यास स्वतः करावा लागायचा ट्युशन,गाईड ,कॉपीचा तर विटाळच असायचा कमी मार्क मिळाल्यावर मार खावा लागायचा आज उतारवयातही बुदधि भ्रष्ट झाली नाही त्या स्वाध्यायाचे महत्त्व आता जाणवतय (७) लहानपणी मोठ्यांचा मान राखावा लागायचा उलट उत्तर देण्याचा तर प्रश्नच नसायचा मग रागावलेला माणूसही आशीर्वाद देऊनच जायचा आज भरल्या घरात अत्यंत सन्मानाने रहातोय त्या संस्कारांचे महत्त्व आता जाणवतय (८)लहानपणी शिस्तीसाठी आईचा धपाटा खाल्ला किशोरवयात त्यासाठीच वडिलांकडून खाल्ला 

आज उतारवयातही शिस्तबद्ध जीवन जगतोय त्या खाल्लेल्या माराचे महत्त्व आता जाणवतय (९) लहानपणी एकत्र कुटुंब पद्धती असायची घरोघरची आई 'श्यामची आई' च असायची वडिलांची करडी नजर प्रेमापोटीच असायची आज त्यांची उणीव ठायीठायी जाणवतेय त्याच्या वात्सल्याचे महत्त्व आता जाणवतय (१०)लहानपणी वाढदिवस साधेपणाने साजरा व्हायचा एखादेच चॉकलेट, पण मोठ्यांचा आशीर्वाद मिळायचा आई-बाबा-आज्जीचा हात मस्तकावरुन फिरायचा आज अमृतमहोत्सवाकडे आरामात वाटचाल करतोय आयुष्यमान भव' चे महत्त्व आता जाणवतय (११)

English Summary: Today's generation must know this Published on: 31 May 2022, 08:30 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters