आज सोन्या-चांदीच्या दरामध्ये वाढ झाली असून देशांतर्गत बाजारात तसेच एमसीएक्स वर ऑगस्टमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 164 रुपयांनी वाढून पन्नास हजार 700 रुपये प्रति दहा ग्रम होता. तसेच ऑक्टोबर मधील डिलिव्हरीसाठी सोने 169 रुपयांच्या वाढीसह 50 हजार 839 रुपये प्रति 10 ग्रॅम असे होते. डिसेंबर मध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 82 रुपयांच्या घसरणीसह पन्नास हजार 860 रुपये प्रति दहा ग्रम होता.
त्यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आज सोन्याचा दर $5.45 च्या उसळीसह $1724.85 प्रति औंस पातळीवर व्यवहार करत होता.
नक्की वाचा:Petrol-Diesel: पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठे बदल; जाणून घ्या आजचे नवीन दर
सोमवारचे सोन्या-चांदीचे दर
जर आपण सोमवारचा विचार केला तर राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे भाव किरकोळ घसरून 51145 रुपये प्रति तोळा असे झाले असून यासंबंधीची माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने दिली आहे. त्यामुळे मागील व्यवहारात सोन्याचे भाव प्रति ग्रॅम पाच हजार 150 रुपये बंद झाला होता.
सोमवारी देशांतर्गत चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून सोमवारी चांदीचा स्थानिक भाव 1331 रुपयांनी घसरून 54351 रुपये प्रति किलो झाला. गेल्या सत्राचा विचार केला तर चांदी 55 हजार 682 रुपये प्रति किलो वर बंद झाली होती.
24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत पाच हजार 82 रुपये प्रति ग्रॅम
तर 22 कॅरेट सोन्याची किंमत चार हजार 960 रुपये प्रति ग्रॅम, 20 कॅरेट सोन्याची किंमत 4523 रुपये प्रति ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत चार हजार 117 रुपये प्रति ग्राम आणि 14 कॅरेट सोन्याची किंमत तीन हजार 278 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Share your comments