Gold Rate Today :- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने घसरण होताना दिसून येत आहे. सोनेच नाही तर चांदीच्या दरात देखील घसरण सुरूच आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ फायद्याचा दिसून येत आहे.
आजच्या दिवशी सोन्याच्या भावात घसरन दिसून आली. आज 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅमचे दर पाहिले तर ते 58380 रुपये असून मागच्या ट्रेडमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅमचे भाव 58,410 रुपये प्रति दहा ग्रॅम वर बंद झाले होते. त्या तुलनेने प्रति दहा ग्रॅम आज तीस रुपयाची घसरण झालेली पाहायला मिळाली.
सोने चांदीचे आजचे दर
आज 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम चे भाव 58 हजार 380 रुपये असून मागील ट्रेड मध्ये ते 58,410 रुपये प्रति दहा ग्रॅम असे होते. तसेच सोन्यासोबत चांदीमध्ये देखील घसरण बघायला मिळत असून जर आपण IBJA या संकेतस्थळाचा विचार केला तर चांदी देखील 70,420 रुपये प्रति किलो या दराने विकली गेली आहे. आपण चांदीचा मागच्या ट्रेडमधील दर पाहिले तर ते 70 हजार 610 रुपये प्रति किलो होती.
महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरातील आजचे दर
बुलियन मार्केटच्या संकेतस्थळानुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे प्रति दहा ग्रॅम दर हे 53,515 आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचे दर हे 58,380 प्रति दहा ग्रॅम असे आहेत. पुण्यामध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर ते 53 हजार पाचशे पंधरा रुपये प्रति दहा ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 58,380 प्रति दहा ग्राम इतके आहेत.
तसेच नागपूर मध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर ५३५१५ प्रति दहा ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार 380 रुपये प्रति दहा ग्राम इतके आहेत. तसेच नाशिक शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर हे 53515 रुपये प्रति दहा ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचे दर 58 हजार 380 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहेत.
Share your comments