Gold Rate Today :- सध्या सोन्याचे आणि चांदीचे दर पाहिले तर यामध्ये सातत्याने घसरण होताना दिसून येत आहे. त्यामुळे बरेच गुंतवणूकदार यावेळेस सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. कारण गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार केला तर बरेच गुंतवणूकदार हे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात.
कारण बऱ्याचदा सोन्यामध्ये केलेली गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळतो. या दृष्टिकोनातून सध्या सोन्याच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळत असून आज देखील भारतीय सराफा बाजारामध्ये सोने चांदीच्या दरात घसरण झाली.
सोने चांदीच्या दरात घसरण
आज 16 ऑगस्ट रोजी सोने आणि चांदीच्या दरामध्ये घसरण झाली व शुद्ध सोन्याचा दर प्रति दहा ग्राम 59 हजार रुपयांच्या खाली आला तर चांदीचे दर देखील 70 हजार रुपये प्रति किलो पर्यंत खाली आले आहे. आपण या आठवड्याच्या सुरुवातीचा विचार केला तर सोमवारी शुद्ध सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 58 हजार 969 रुपये होता. त्यामध्ये घट होऊन तो दर 58,843 रुपयांवर आला.
जर याबाबतीत आपण इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीचा आधार घेतला तर आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्राम 58 हजार 843 रुपये, 23 कॅरेट 58 हजार 607 रुपये, 22 कॅरेट 53 हजार 900, 18 कॅरेट 44132 आणि 14 कॅरेट सोन्याचा दर 34 हजार 423 रुपयांवर उघडला होता.
११ जुलै नंतर पहिल्यांदा सोने 59 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या खाली
जर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर या ठिकाणी देखील सोन्याचा दर पाच महिन्याच्या निचांकी पातळीवर गेला आहे. एमसीएक्स वर सोन्याचा दर 59000 च्या खाली आला असून 11 जुलै नंतर पहिल्यांदा सोन्याचे दर हे 59000 च्या खाली आले आहेत. तसेच चांदीचा दर हा एमसीएक्स वर 70 हजार रुपयांच्या खाली आला आहे.
Share your comments