शेतजमिनीच्या हद्दीवरून बऱ्याच प्रकारचे वाद होत असतात.जमिनीची हद्द कायमची करायचे असेल तर त्यासाठी जमीन हद्द मोजणी अर्ज नमुना उपलब्ध आहे.हा अर्ज भूमी अभिलेख कार्यालय येथे सादर करावा लागतो. जमीन हद्दमोजणी अर्ज नेमका काय आहे? याबद्दलची माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.
जमीन हद्द मोजणी अर्ज
शेती व्यवसाय म्हटला म्हणजे जमिनीबाबतचे अनेक कलह आणि समस्या यांना तोंड द्यावे लागते.अनेक शेजारचे शेतकरी म्हणजेच आपल्या जमिनी लगत असलेल्या शेतकऱ्याने कमी-जास्त प्रमाणात अतिक्रमण केलेलेअसते.त्यामुळे अनेक प्रकारचे वाद विवाद निर्माण होत असतात.गावपातळीवर हे वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो.परंतु कधीकधी हे वाद इतका विकोपाला जातात की जीवितहानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. जर अशी काही समस्या निर्माण झाली असेल तर आपण भुमिअभिलेख मध्ये मोजणी भरून कायदेशीर रीत्या आपल्या क्षेत्राच्या हद्द कायमकरून घेऊ शकता.जमीन हद्द मोजणी अर्ज हा मा.उपाधीक्षक भुमिअभिलेख यांना सादर करावा लागतो.तुमच्या असलेल्या जमिनीचे क्षेत्र जर तुम्हाला कमी वाटत असेल तर मोजणी अर्ज हा भूमी अभिलेख कार्यालय मध्ये दाखल करावा लागतो. हद्द कायम करण्यासाठी महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 कलम 136 अशी कायदेशीर तरतूद केलेली आहे. मोजणीचा अर्ज सादर केल्यानंतर मोजणी अर्जाला मोजणी रजिस्टर नंबर दिला जातो.हा अर्ज भरताना त्यावरील सर्व माहिती नीट व्यवस्थित वाचून योग्य माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.
जमीन मोजणी अर्ज व त्यातील बारकावे……
- हद्द कायम करत असताना आपल्या क्षेत्राची मूळ अभिलेख आतून टिपण किंवा एकत्रीकरण उतारे काढून त्या संबंधित प्रकरणासजोडले जातात.
- जर याबाबतची मूळ टिपण उपलब्ध नसेल तर सर्वे च्या वेळी गाव नकाशा तयार करण्यात येत असतो. त्याची मदत घेऊन सुद्धा शेतकऱ्याच्या क्षेत्राचे हद्द कायम केली जाते.
- सदर प्रकरण मोजणीसाठी सर्व्हेअर कडे देण्यात येते. भूमी अभिलेख कार्यालय मध्ये ज्या शेतकऱ्यांनी मोजणी भरली आहे त्या शेतकऱ्याला तसेच त्यांच्या शेताला लागून असलेल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना 15 दिवस अगोदर नोटीस पाठवण्यात येते.
- सदर नोटिशीमध्ये दिलेल्या तारखेनुसार सर्वेअर मूळ किंवा नकाशाच्या आधारे गट नंबर किंवा सर्वे नंबर ची मोजणी करून खुणाटाकून अर्जदाराला त्याची हद्द कायम करून दिली जाते.
- ज्या ठिकाणी जमिनीची हद्द टाकली जाते तिथे काही सवाल जवाब करून मोजणी करत असताना तिथे उपस्थित मंडळींच्या सह्या घेतल्या जातात.
- जमिनीची मोजणी करताना दर्शवलेल्या खुणा मान्य असेल किंवा नसेल तर त्याची नोंद ही पंचनामा मध्ये केली जाते. मोजणी झाल्यानंतर ते प्रकरण कार्यालयामध्ये जमा केले जाते.
- मोजणी मान्य असेल तर काही दिवसानंतर हद्द कायम नकाशा क प्रतही अर्जदारास देऊन ते प्रकरण बंद होत असते.
- जर मोजणी मान्य नसल्यास परत मोजणी करता येऊ शकते.
(संदर्भ-digitaldg.in)
Share your comments