कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. म्हणून अनेक जण नोकरीच्या शोधात आहेत. चला तर मग जाणून घेवूया नोकरीची संधी कोणकोणत्या क्षेत्रात आहेत. तसेच यासाठी कसा अर्ज करावा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड (National Health Mission, Beed
पोस्ट – वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी युनानी, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट (NLEP), सिस्टर इन्चार्ज (SNCU), स्टाफ नर्स, LHV, समुपदेशक, लेखापाल, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, जिल्हा आशा ब्लॉक फॅसिलिटेटर, ऍनेस्थेटिस्ट, ईएनटी सर्जन, प्रसूतीतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, फिजिशियन.
एकूण जागा – 87
शैक्षणिक पात्रता – MBBS, MSW, B.Com, MD (सविस्तर माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
वयोमर्यादा – 18 ते 43 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता – आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड
अधिकृत वेबसाईट – beed.gov.in
IDEMI, मुंबई (Institute For Design of Electrical Measuring Instruments Mumbai)
पोस्ट – अप्रेंटिस यात प्रोग्रामिंग & सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंटसाठी 10 जागा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी 3 जागा, इन्स्ट्र्मेट मेकॅनिक पदासाठी 3 जागा, फिटर पदासाठी 3 जागा, मशिनिस्टसाठी 3 जागा, मशिनिस्ट (ग्राइंडर)साठी 3 जागा, टूल्स & डाई मेकिंगसाठी 2 जागा, मेकॅनिक मशीन टूल मेंटनेंस, IT & ESM, इलेक्ट्रिशियन, टर्नरसाठी प्रत्येकी 1 जागा आहे.
एकूण जागा – 29
शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेडमध्ये ITI
नोकरीचं ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट – idemi.org
भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी (Indian Navy Recruitment 2022)
नौदलाच्या वेस्टर्न कमांडने ‘गट सी’च्या विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना (Notification) जारी केली आहे. या भरतीची जाहिरात 26 फेब्रुवारी 2022 रोजी जारी करण्यात आली आहे.
नौदलाच्या वेस्टर्न कमांडने जारी केलेल्या माहितीनुसार ‘गट क’ च्या पदांवर भरतीद्वारे निवडलेल्या उमेदवारांची फायरमन, फार्मासिस्ट आणि पेस्ट कंट्रोल वर्कर या रिक्त पदांवर नियुक्ती केली जाईल. या भरतीमध्ये एकूण रिक्त पदांची संख्या 127 आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी जाहिरात जारी झाल्यापासून 60 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात, त्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.
रिक्त पदांची माहिती
1) फायरमन- 120
2) फार्मासिस्ट- 01
3) कीटक नियंत्रण कर्मचारी- 06
या भरतीसाठी उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी, अंतरिम नियुक्ती पत्र आणि कागदपत्रांद्वारे केली जाईल. ‘गट सी’च्या रिक्त पदांवर भरतीसाठी अर्जदार किमान दहावी उत्तीर्ण असावेत. इतर आवश्यक पात्रता तपासण्यासाठी, उमेदवार davp.nic.in वर भेट देऊन अधिसूचना पाहू शकतात. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागेल.
उमेदवार davp.nic.in वर जाऊन त्यांचा अर्ज डाउनलोड करू शकतात. उमेदवारांनी रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो लावून फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, हेडक्वॉर्टर वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलाड पिअर, टायगर गेट जवळ, मुंबई- 400001 या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे (Indian electronics limited Pune)
एकूण 20 जागांसाठी भरती होत आहे.
1) प्रोजेक्ट इंजिनिअर I (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल)
एकूण जागा – 10
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech/(इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल), 2 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – 32 वर्षांपर्यंत
2) प्रोजेक्ट इंजिनिअर-I (सिव्हिल/इलेक्ट्रिकल)
एकूण जागा – 2
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech/(सिव्हिल/इलेक्ट्रिकल), २ वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – 32 वर्षांपर्यंत
3) ट्रेनी इंजिनिअर-I
एकूण जागा – 8
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech/(इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल)
वयोमर्यादा – 28 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण – पुणे, नागपूर
अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी – contengr-1@bel.co.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Sr. Dy. General Manager (HR&A), Bharat Electronics Limited, N.D.A.Road, Pashan, Pune- 411021
अर्जाची शेवटची तारीख – 16 मार्च 2022
Share your comments