केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवत असते. ज्यामधून त्यांना आर्थिक चांगला लाभ मिळेल. सध्या आरोग्य विम्याकडे (health insurance) बऱ्याच लोकांचा कल वाढला आहे. मात्र आरोग्य विमा घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? याविषयी आपण जाणून घेऊया.
कंपन्यांच्या अटी या विमा काढतानाच जोडलेल्या असतात. परंतु पॉलिसी (policy) घेताना बहुतेक ग्राहकांना पॉलिसीच्या अटी व शर्तींची माहिती नसते किंवा ते माहिती नीट घेत नाहीत. त्यामुळे जेव्हा ते दाव्यासाठी अर्ज करतात तेव्हाच त्यांना याची माहिती असते.
माहितीनुसार तुम्ही आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करता तेव्हा तुमचं कव्हरेज लगेच सुरू होत नाही. ठराविक कालावधीनंतरच ते सुरू होतं. याला वेटिंग पिरीएड म्हणतात. वेगवेगळ्या कंपन्या आणि त्याच्या पॉलिसींचा वेटिंग पिरीएड वेगवेगळा असतो.
डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी या घरगुती उपायांचा करा वापर; जाणून घ्या
तरीही पॉलिसी घेतल्याबरोबर अपघातांमुळे होणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी दावा केला जाऊ शकतो. साधारणपणे 30 दिवसांनी रोगांसाठी विम्याचं कव्हरेज सुरू होतं.
सब लिमिट ही अशी अट असते, ज्याबद्दल बहुसंख्य पॉलिसीधारकांना माहिती नसते. सब लिमिट कंपनी एका मर्यादेपर्यंतच्या सेवेसाठी खर्च झालेल्या पैशांचा क्लेम देते.
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक; मिळतोय सर्वाधिक व्याजदर, वाचा सविस्तर
उदाहरणार्थ, तुमच्याकडे 5 लाख रुपयांचं विमा कव्हर असेल पण हॉस्पिटलमध्ये (hospital) भरती झाल्यावर रुमच्या भाड्यासाठी लागणाऱ्या खर्चाबद्दल कंपनीने एक ठराविक रक्कम निश्चित करून ठेवली असेल, तर ती एकूण विम्याच्या रकमेच्या 1% असू शकते.
अशावेळी तुम्हाला रुमच्या भाड्याची काही रक्कम तुमच्या स्वतःच्या खिशातून द्यावी लागू शकते. त्याचप्रमाणे अॅम्ब्युलन्स फी, डॉक्टर फी इत्यादी खर्चांवरही सब लिमिट असते.
महत्वाच्या बातम्या
दिलासादायक! 2 हजार 552 पशुपालकांच्या खात्यावर 6 कोटी रुपयांची रक्कम जमा
नोव्हेंबर महिन्यात 'या' राशीच्या लोकांचे उजळणार भविष्य; उत्पन्नात होणार चांगली वाढ
धक्कादायक! 'या' जिल्ह्यात साडेतीन हजार पेक्षा अधिक जनावरांना लम्पीचा प्रादुर्भाव
Share your comments