आपण आपल्या आजूबाजूला विशेषतः शेतात गवत ही वनस्पती पाहिलीच असेल. ही वनस्पती सर्वसामान्यपणे सगळीकडेच दिसते. तुम्ही जे गवत पहिले असेल त्या गवताची लांबी फार लहान असेल. मात्र तुम्हाला जगातील सर्वात मोठे गवत माहितीये का? आपण आजवर कितीतरी वनस्पती पहिल्या असतील मात्र ही जगातील सर्वात मोठी वनस्पती ठरली आहे जी जमिनीवर नाही तर पाण्यात सापडली आहे. या वनस्पतीचे नाव आहे 'पोसिडोनिया ऑस्ट्रॅलिस'. एका बीजापासून जन्मलेल्या या जलचर वनस्पतीने जवळपास १८० किलोमीटरहून अधिक क्षेत्र व्यापले आहे. या जलचर वनस्पतीची पुष्टी शास्त्रज्ञांनी केली आहे.
शास्त्रज्ञांनी दिली सविस्तर माहिती
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या गवताचे नाव पोसिडोनिया ऑस्ट्रेलिस आहे. तसेच हे गवत रिबन वीड सी या गवताच्या प्रकारात मोडते. यावर युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि फ्लिंडर्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी संयुक्तपणे संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनात त्यांना हे गवत शार्क बे परिसरात जवळपास 180 किलोमीटरपर्यंत पोहोचलेले आढळून आले.
या संशोधनाचे प्रमुख शास्त्रज्ञ जेन एजेलो यांच्या मते, हे गवत पृथ्वीवरील आतापर्यंतची सर्वात मोठी वनस्पती असून ती एका रोपापासून 180 किमीपर्यंत पसरते. जेन एजेलो यांनी याबाबत बराच अभ्यास करून हे सिद्ध केले आहे. त्यामुळे आता ही वनस्पती देखील सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. त्यांच्या अभ्यासावरून या वनस्पतीने विविध प्रकारचे तापमान, वातावरण तसेच विविध परिस्थिती सहन करून इतकी लांबी गाठल्याचे त्यांनी सांगितले.
जगातील मोठ्या गवत वनस्पतीचा शोध -
समुद्रातील हे गवत सुमारे 200 चौरस किमी परिसरात पसरलेले आहे. शास्त्रज्ञांच्या टीमने शार्क बे या परिसरात शोध घेतला असता त्यांना जगातील सर्वात मोठे गवत सापडले. पर्थच्या उत्तरेस 800 किमी अंतरावर शार्क बे हा परिसर लागतो. या प्रजातीत मोडणारी वनस्पती साधारणतः एका वर्षात 35 सेंटीमीटरच्या दराने कुरणासारखी वाढते.
याबाबत संशोधकांचा असा अंदाज आहे की, सध्याच्या आकारापर्यंत विस्तार होण्यासाठी या वनस्पतीला जवळजवळ 4,500 वर्षे असणार. याआधी अमेरिकेच्या उटाह राज्यातील पांडो नावाच्या अस्पेन वृक्ष जगातील सर्वात मोठी वनस्पती म्हणून ओळखली जायची. मात्र आता शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे अजून एका नव्या वनस्पतीचा शोध लागला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Technology: वाळलेली फुले आणि पाने वाढवतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, नवीन तंत्रज्ञान विकसित
ठरलं तर! पीक विम्यासाठी सरकार देतयं 80 कोटी 36 लाखांचा निधी; 'या' शेतकऱ्यांना मिळणार लाभ
Share your comments