पंजाबराव डख यांच खच्चीकरण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे! अंदाज पंजाबराव डख यांचाच खरा ठरतोय काही अंशी चुकला असेल पण एवढ्या दिवसात त्यांचे बहुतेक अंदाज 80 टक्यापर्यंत खरे ठरलेले दिसतात! पाऊस पंजाबराव यांच्या अंदाजाप्रमाणे पडत आहे फक्त सगळीकडे आणखी पाऊस पोहचला नाही,सर्व भाग मान्सून ने व्यापला नाही! शेवटी निसर्गापुढे माणूस काय करू शकतो पण मागील चार पाच वर्षात जे हवामान विभागाला जमले नाही ते पंजाबराव डख यांनी करून दाखवले आहे! इथं पाऊस सगळीकडे पोहचला नाही या
दुखापेक्षा पंजाबराव डख यांचा अंदाज चुकला याचा आनंद बऱ्याच लोकांना झालेला दिसतोय. पण एवढ्या दिवसात आणि आताही ते शेतकऱ्यांसाठी करत असलेले निस्वार्थ कार्य नाकारू शकत नाही. आजही त्यांना मानणारे विश्वास ठेवणारे हजारो शेतकरी आहेत . निसर्ग कोणाच्या हातात नसतो, अनिश्चित असतो त्यात एखाद्या व्यक्तीवर चुकला म्हणून दोष देणे चूक आहे! आपल्यात धोरण ठरवणाऱ्या राज्यकर्ते, प्रशासन यांना जबाब विचारण्याची हिम्मत नाही! हमीभाव, खत औषधी याची गुणवत्ता, कापसात नवीन संशोधन, ठिबक
स्प्रिंकलर चे अनुदान, शेतरस्ते, सिंचन प्रकल्प, शेतीसाठी शाश्वत पाणी अशा एक ना अनेक गोष्टीवर काम होत नाही, धोरण चुकत आहेत आपली हिम्मत नाही त्यावर बोट ठेवण्याची! फक्त सोप टार्गेट असेल तर खुलेपणाने टीका करायची! येणाऱ्या काळात हमीभाव, खत औषधी याची गुणवत्ता, कापसात नवीन संशोधन, ठिबक स्प्रिंकलर चे अनुदान, शेतरस्ते, सिंचन प्रकल्प, शेतीसाठी शाश्वत पाणी अशा एक ना अनेक गोष्टीवर काम होत नाही, धोरण चुकत आहेत आपली हिम्मत नाही त्यावर बोट
ठेवण्याची!फक्त सोप टार्गेट असेल तर खुलेपणाने टीका करायची!येणाऱ्या काळात पंजाब डख यांची दखल पुन्हा एकदा घेतली जाईल यात शंका नाही! निस्वार्थपणे गेल्या 7-8 वर्षापासून शेतकऱ्यांची इमानदारीने सेवा करत आहे! टीका करणारे कितीही असू द्या तळहाताने सूर्य झाकता येत नाही, हे तितकंच खरं! चांगल्या माणसाना बदनाम करणे सोपं आहे पण त्यांच्या कर्तृत्वाची दखल घ्यावीच लागते हा इतिहास आहे!त्यांच्या नावातच पंजाब आहे म्हणजे एका राज्याचं नाव आहे त्यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या शुभेच्छा, पाठींबा त्यांच्यासोबत आहेत!
- अमोल थिटे पाटील
Share your comments