माणसाप्रमाणे प्राण्यांनादेखील संवेदना असते. आणि कितीही झालं तरी आई ती आईच असते. आई आपल्या पिल्लांच्या सुरक्षतेसाठी कोणत्याही संकटांवर मात करू शकते. याची कितीतरी उदाहरणे आपण सोशल मीडिया वर पहिली असतील. प्राण्यांमधील माणुसकीचा आपल्याला कित्येक वेळा प्रत्येय आलाय. आजकाल लोक माणसापेक्षा सगळ्यात जास्त जीव प्राण्याला लावताना दिसतात.
प्राण्यांमधील माणुसकी आणि आपुलकीचे सत्य कुणीच टाळू शकत नाही. सोशल मीडिया वर तर कितीतरी प्राण्यांच्या प्रामाणिकपणाची तसेच निस्वार्थी जीव लावण्याचे कितीतरी विडिओ वायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल झाला आहे. बिहारच्या रोहतास जिल्ह्यात घडलेली ही घटना आहे.
एक माकडीण आपल्या जखमी झालेल्या पिल्लाला उपचारासाठी क्लिनिकमध्ये उपचारासाठी घेऊन आली. ही घटना घडली आहे डॉ. एस. एम. अहमद यांच्या खासगी क्लिनिकमध्ये. हा आगळावेगळा प्रकार पाहण्यासाठी त्या परिसरातील नागरिकांनी बरीच गर्दी केली होती. शिवाय त्याचा एक विडिओ सोशल मीडियावर वायरल देखील करण्यात आला आहे.
उपचार होईपर्यंत माकडीण आपल्या पिल्लाला छातीशी कवटाळून बसली होती. कोठून तरी पडल्यामुळे माकडीण व तिचे पिल्लू जखमी झाले असावेत. असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्या जखमी अवस्थेतच ती क्लिनिकसमोर आपल्या पिल्लाला घेऊन बसली होती. जेव्हा डॉक्टरांनी माकडिणीला खाणाखुणा करून आत बोलावले. काही वेळाने ती क्लिनिकमध्ये डॉक्टरांच्या खुर्चीच्या बाजूला असलेल्या स्टुलवर जाऊन बसली.
मोठी बातमी! गहू निर्यात बंदीबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय
डॉक्टरांनी देखील उपचाराला लगेचच सुरुवात केली. तिला व तिच्या पिलाला मलमपट्टी केली. मलमपट्टी होताच माकडिणीने तिथून लगेचच धूम ठोकली. त्यानंतर तेथील गावकऱ्यांनी त्या माकडिणीचा शोध घेतला मात्र प्रयत्न करूनही ती कुठेच सापडली नाही. मात्र हा आगळावेगळा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. याचा विडिओ काढून सोशल मीडिया वर व्हायरल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनो काळजी घ्या; झाडाचा आसरा घेणं मेंढपाळ्याला पडलं महागात...
मान्सूनपूर्व पावसाची शेतकऱ्यावर अवकृपा; शेतकऱ्यांची सरकारकडे 2 लाखांची मागणी
Share your comments