1. इतर बातम्या

Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरची ग्राहकाने काढली गाढवाला बांधून गावभर धिंड, कारणही आले समोर..

आजच्या आधुनिक काळात इलेक्ट्रिक गाडयांना जलदगती मिळाली आहे. मात्र इलेक्ट्रिक गाडयांच्या वापरासाठी जेवढं जास्त प्रोत्साहित केलं जात आहे तेवढंच त्यासोबत घडणाऱ्या घटना देखील वाढत चालल्या आहेत.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
इलेक्ट्रिक स्कूटरची ग्राहकाने काढली गाढवाला बांधून गावभर धिंड, कारणही आले समोर..

इलेक्ट्रिक स्कूटरची ग्राहकाने काढली गाढवाला बांधून गावभर धिंड, कारणही आले समोर..

आजच्या आधुनिक काळात इलेक्ट्रिक गाडयांना जलदगती मिळाली आहे. मात्र इलेक्ट्रिक गाडयांच्या वापरासाठी जेवढं जास्त प्रोत्साहित केलं जात आहे तेवढंच त्यासोबत घडणाऱ्या घटना देखील वाढत चालल्या आहेत. सध्या पेट्रोल -डिझेलच्या महागाईच्या भडक्यात लोकांना इलेक्ट्रिक वाहनांमुळे दिलासा मिळत आहे. मात्र बघायला गेलं तर इलेक्ट्रिक वाहन तेवढेच असुरक्षितसुद्धा आहेत.

इलेक्ट्रिक वाहनासंदर्भात अशाच घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे वाचून तुम्ही देखील इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यापूर्वी विचार कराल. नुकताच सोशल मीडियावर ओला इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याची घटना व्हायरल झाली. या घटनेननंतर ओला कंपनीने १४४१ स्कूटर माघारी घेतले. या विषयाला अनुसरून ओला कंपनीने एक स्टेटमेंट जरी केले आहे. त्यात त्यांनी सांगितले की, २६ मार्चला ओला स्कूटरला लागलेल्या आगीची तपासणी चालू आहे.

शिवाय ओला इलेक्ट्रिक स्कूटरला लागलेल्या आगीमुळे विस्तारित पडताळणी करण्यासाठी आम्ही या बैचमधील सगळे इलेक्ट्रिक स्कूटर माघारी घेतले. शिवाय आमचे सगळे सर्विस इंजीनियर या बैचमधील सगळ्या स्कूटर चे परीक्षण करीत आहेत. तसेच त्याच्या बैटरी सिस्टमला देखील चेक केले जात आहे.ओला कंपनीने हे सुद्धा सांगितलं आहे कि, इलेक्ट्रिक स्कूटरचे बैटरी AIS 156 पासून टेस्टिंग झालेली आहे. कंपनीने हे पण सांगितले की, या स्कूटरला यूरोपीयन स्टैंडर्ड ईसीई १३६ च्या अनुरूप तयार करण्यात आले आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरला लागलेल्या आगीमुळे सरकारनेसुद्धा नागरिकांच्या सुरक्षतेसाठी एका समितीची निर्मिती केली आहे. ज्यामध्ये सगळ्या इलेक्ट्रिक वाहन कंपनींवर लक्ष ठेवले जाईल. आणि ही समिती आग लागलेल्या घटनांची विस्तारित पडताळणी करणार. सरकारने इलेक्ट्रिक कंपनींना हे सुद्धा सांगितले की, यांसारख्या निष्काळजी गोष्टींची ते निंदा करतात.

दुसरी घटना घडली आहे बीड जिल्ह्यातील परळी येथे. सचीन गित्ते या ग्राहकाने १६ सप्टेंबर २०२१ रोजी २० हजार रुपये भरून ओला कंपनीची इलेक्ट्रीक दुचाकी बुक केली. २१ जानेवारी रोजी त्यांनी उर्वरीत ६५ हजार रुपयेही भरले. त्यांना २४ मार्च रोजी गाडी ताब्यात मिळाली. मात्र ही गाडी सहाच दिवसात बंद पडली. त्यांनी कंपनीशी संपर्क साधला. कंपनीचा मॅकेनिक येऊनही गेला, पण दुचाकी काही दुरुस्त झाली नाही. त्यामुळे वैतागलेल्या या ग्राहकाने चक्क या दुचाकीची गाढवाला बांधून परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील रस्त्यावरून सगळीकडे धिंड काढली.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांच्या मागे लागलेली साडेसाती काही संपेना, आता शेतकऱ्यांवर दुहेरी संकट..
स्मार्ट व्यवस्थापन देईल स्मार्ट उत्पादन! या पद्धतीने तुरीचे हेक्टरी 40 क्विंटल उत्पादन शक्य
पाणी प्या परंतु बसूनच! यामुळे होतात आरोग्याला खूपच काही फायदे, वाचा आणि घ्या जाणून

English Summary: The customer took out the electric scooter, tied the donkey and drove it all over the village. Published on: 25 April 2022, 12:54 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters