अनेक तरुण पोलीस भरती प्रक्रियेचे चातकासारखे वाट पाहत आहेत. अशा तरुणांसाठी एक आनंदाची बातमी असून ठाकरे सरकारने भरती संदर्भातली रखडलेली कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून मिळालेल्या माहितीनुसार
राज्यात सन 2020 ची पोलीस शिपाई संवर्गातील 7231 रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली असून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियम मध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदाच मैदानी चाचणी होणार असून या चाचणीमध्ये उत्तीर्ण उमेदवारास लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत.
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी अशी असेल
पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात येणारी शारीरिक चाचणी ही 50 गुणांची असणार आहे. यामध्ये
1- पुरुष उमेदवारसाठी- सोळाशे मीटर धावणे( 20 गुण), 100 मीटर धावणे ( पंधरा गुण), गोळा फेक( पंधरा गुण) असे पुरुष उमेदवारांसाठी मैदानी चाचणीचे स्वरूप असेल.
2- महिला उमेदवार- 800 मीटर धावणे( 20 गुण), 100 मीटर धावणे( पंधरा गुण), गोळा फेक( पंधरा गुण) असे एकंदरीत महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणीचे स्वरूप राहणार आहे.
3- त्यासोबतच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई( पुरुष ) पदासाठीच्या मैदानी चाचणी एकूण 100 गुणांची होणार असून यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 5 किमी धावणे( 50 गुण), 100 मीटर धावणे( 25 गुण), गोळा फेक( 25 गुण)एकूण 100 गुण असणार आहेत.
लेखी परीक्षेचे स्वरूप
मैदानी चाचणी मध्ये किमान50 टक्के गुण मिळवणे आवश्यक असून अशा उमेदवार, संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांची लेखी चाचणीसाठी पात्र असतील.
लेखी चाचणी मधील अभ्यासक्रमाचा विचार केला तर यामध्ये अंकगणित,जनरल नॉलेज व करंट अफेयर्स अर्थात चालू घडामोडी व बुद्धिमत्ता चाचणी तसेच मराठी व्याकरण या विषयांवर आधारित प्रश्न विचारलेले असतील व हे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील.
परीक्षेची भाषाही मराठी असूनवर्षाचा कालावधी 90 मिनिटांचा असेल. या परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे.
या पेक्षा कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल. याबाबतीत पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी प्रत्येक पोलिस घटकासाठी गठीत केलेली निवड मंडळ शारीरिक व लेखी मध्ये मिळवलेल्या गुणांचे एकत्रीकरण करून फायनल मेरिट लिस्ट अर्थात अंतिम गुणवत्ता यादी तयार करतील.
Share your comments