अलिकडे अनेक तरुण युवक व्यवसाय करण्याला जास्त प्राधान्य देताना दिसत आहेत, म्हणून आज आम्ही आमच्या वाचक मित्रांसाठी एका अशा भन्नाट व्यवसायाची कल्पना घेऊन आलो आहोत जो व्यवसाय आपण आपल्या राहत्या घरी देखील सुरू करू शकता आणि या व्यवसायातून आपण तगडी कमाई देखील करू शकता. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे पापड मेकिंग बिजनेस आपण हा व्यवसाय अगदी कमी भांडवलात सुरु करू शकता. जर आपण बनवीत असलेल्या पापडला युनिक स्वाद असेल तर याची मागणी ही देखील वाढू शकते आणि आपण आपला स्वतःचा एक ब्रँड बनवू शकता.
भारत सरकारची एक संस्था नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन या संस्थेने या व्यवसायासाठी एक रिपोर्ट तयार केला आहे. मित्रांनो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पंतप्रधान मुद्रा लोन योजना द्वारे आपणास चार लाख पर्यंत लोन देखील उपलब्ध होऊ शकते. या संस्थेच्या रिपोर्टनुसार आपण या व्यवसायासाठी एकूण सहा लाख रुपये इन्वेस्ट करून जवळपास 30 हजार किलोचे प्रोडक्शन यातून मिळू शकता. या व्यवसायासाठी अडीचशे स्क्वेअर मीटर जागा आवश्यक असते.
- Read This :- Amla cultivation: 'ह्या' गोष्टींची काळजी घेऊन करा आवळ्याची लागवड आणि दरवर्षी कमवा लाखो, जाणुन घ्या सविस्तर
जसं की आम्ही आपणांस सांगितलं की या व्यवसायासाठी सहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चामध्ये फिक्स कॅपिटल आणि वोर्किंग कॅपिटल दोन्ही समाविष्ट आहे. अहवालानुसार, स्थिर भांडवलामध्ये 2 मशीन, पॅकेजिंग मशीन उपकरणे आणि खेळत्या भांडवलामध्ये तीन महिन्यांचा कर्मचाऱ्यांचा पगार, कच्चा माल आणि तीन महिन्यांसाठी उपयुक्तता उत्पादन खर्च यांचा समावेश होतो. याशिवाय भाडे, वीज, पाणी, टेलिफोन बिल आदी खर्चाचाही यात समावेश आहे.
किती होईल कमाई
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 250 स्क्वेअर मीटर जागेची आपणास आवश्यकता लागणार आहे. याशिवाय तीन अकुशल कामगार, दोन कुशल कामगार आणि एक सुपरवायझर एवढे मनुष्यबळ लागणार आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणास चार लाख रुपये पर्यंत लोन मिळू शकते, त्यामुळे तुम्हाला फक्त दोन लाख रुपये इन्वेस्ट करून हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. रिपोर्टनुसार जर आपण सहा लाख रुपये इन्वेस्ट करून हा व्यवसाय सुरू केला तर आपणास मंथली एक लाख रुपयांची कमाई होऊ शकते यात आपला नेट प्रॉफिट 35 ते 40 हजार रुपये राहू शकतो.
Share your comments