1. फलोत्पादन

Amla cultivation: 'ह्या' गोष्टींची काळजी घेऊन करा आवळ्याची लागवड आणि दरवर्षी कमवा लाखो, जाणुन घ्या सविस्तर

देशात शेतकरी अलीकडे नगदी पिकांच्या लागवडिकडे वळताना दिसत आहेत. अनेक शेतकरी फळबागा लागवड करीत आहेत आणि यातून चांगली कमाई करत आहेत. फळपिकापैकी एक महत्वाचे पीक म्हणजे आवळा, आवळा एक समशितोष्ण हवामाणात वाढणारे पीक आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
awala plant

awala plant

देशात शेतकरी अलीकडे नगदी पिकांच्या लागवडिकडे वळताना दिसत आहेत. अनेक शेतकरी फळबागा लागवड करीत आहेत आणि यातून चांगली कमाई करत आहेत. फळपिकापैकी एक महत्वाचे पीक म्हणजे आवळा, आवळा एक समशितोष्ण हवामाणात वाढणारे पीक आहे.

देशात हिवाळ्यात आणि उन्हाळी हंगामात त्याची लागवड केली जाते. पिकलेला आवळा हा जवळपास 0 ते 46 अंश सेल्शिअस पर्यंत तापमान सहन करू शकतो. आवळ्याच्या मोहर निघताना गरम हवामान अधिक योग्य असल्याचे सांगितले जाते. जुलै ते ऑगस्ट महिन्यात जास्त ओलाव्यामुळे छोटी सुप्त फळे आवळ्याला येतात, तर पावसाळ्याच्या दिवसात झाडावरुन जास्त फळे पडतात, त्यामुळे नवीन छोटी फळे बाहेर येण्यास विलंब होतो.

आवळ्याची लागवड वालुमिश्रित माती असलेल्या जमिनीत तसेच चिकणमाती असलेल्या जमिनीत करावे असा सल्ला कृषी वैज्ञानिक देतात. आवळा लागवडीसाठी 10 फूट x 10 फूट किंवा 10 फूट x 15 फूट आकाराचे खड्डे खणले जातात, आवळ्याचे रोप हे 1 घनमीटर आकाराच्या खड्ड्यात लावण्याची शिफारस केली जाते. आवळ्याची रोपे खड्ड्यात लावण्याआधी खड्डे 15-20 दिवस मोकळी ऊन खात पडू द्यावीत, खड्ड्याना चांगले ऊन भेटल्याने त्यात असलेले विषाणू नष्ट होतात त्यामुळे उत्पादन चांगले मिळते.

प्रत्येक खड्ड्यात 20 किलो गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत, 1-2 किलो निंबोळी पेंड आणि 500 ​​ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर टाकावे असा सल्ला दिला जातो. खड्डा भरताना 70 ते 125 ग्रॅम क्लोरोपायरीफॉस धूळ देखील भरावी. हे खड्डे मे महिन्यात पाण्याने भरावेत, तर खड्डा भरल्यानंतर 15 ते 20 दिवसांनीच आवळ्याची रोपे लावावीत. आवळा पिकामध्ये क्रॉस-परागीकरण होते, म्हणून या पिकातून अधिकचे उत्पादन घेण्यासाठी, 2: 2: 1 च्या प्रमाणात किमान 3 आवळ्याच्या जातींची रोपे लावावीत.  उदाहरणार्थ, उत्तम परिणामांसाठी नरेंद्र-7 ची ​​80 रोपटी, कृष्णाची 80 आणि कांचनची 40 रोपे एक एकरमध्ये लावावीत.

आवळ्याच्या कलमी रोपाला लागवडीच्या तिसर्‍या वर्षी फळे यायला सुरवात होते, आणि बियान्याद्वारे लागवड केल्यास आवळ्याच्या झाडाला ८ वर्षांनी फळे यायला सुरवात होते.  कलमीच्या झाडाला 10 ते 12 वर्षांनी पूर्णतः फळे येण्यास सुरुवात होते आणि झाडांची चांगली काळजी घेतली तर आवळ्याचे झाड हे 50 ते 60 वर्षे फळ देते. पूर्ण वाढ झालेल्या आवळ्याच्या झाडाला एक ते तीन क्विंटल फळे येतात. अशा प्रकारे एकरी 6 ते 8 टन उत्पादन मिळू शकते.  अशा रीतीने आवळ्याच्या पिकातून लाखोंची कमाई होऊ शकते.

English Summary: through amvla cultivation earn more profit in early Published on: 07 December 2021, 07:16 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters