छोट्या उद्योगांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना सुरू केली. या योजनेचा फायदा घेऊन आपण आपला व्यवसाय वाढवू शकता. यातून १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. जर आपण २ ते ३ लाख रुपयांची गुंतवणूक करून व्यवसाय उद्योग सुरू करु शकत असाल तर मोदी सरकार आपल्याला मदत करणार. सरकार आपल्याला ७५ ते ८० टक्क्यांपर्यंतचे कर्ज देत असते. यातून आपण आपल्या व्यवसायाचा विकास कर शकता. आम्ही काही व्यवसायाची कल्पना सुचवत आहोत. मुद्रा लोनचा फायदा घेऊन आपण हे व्यवसाय सुरू करु शकता. त्यासाठी आपल्याकडे २ ते ३ लाख रुपये असणे आवश्यक आहे.
पापड बनविण्याचा उद्योग करा सुरू:
या योजनेचा फायदा घेऊन आपण पापड बनविण्याचा व्यवसाय सुरु करु शकता. यासाठी आपल्याकडे २.०५ लाख रुपये असणे आवश्यक आहे. बँकेकडून आपल्याला पापड उद्योगासाठी साधरण ८.१८ लाख रुपयांचे कर्ज मिळू शकता. दरम्या आपल्याला यातून अनुदान सब्सिडी मिळणार आहे. १.९१ लाख रुपये ही सब्सिडी यातून मिळणार आहे.मुद्रा योजनेंतर्गत आपण लाइट इंजिनीअरिंगचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट (जसे की नट, बोल्ट, वॉशर किंवा इत्यादी) बनविण्याचे काम सुरू करू शकता. यासाठी आपल्याला १.८८ लाख रुपये हवे असून बँक आपल्याला २.२१ लाख रुपयांचे कर्ज आणि २.३० लाख रुपये वर्किंग कॉपिटलच्या रुपात कर्ज देणार. एका महिन्यात साधारण २५०० किलोग्राम नट- बोल्ट बनव शकू. वर्षभरात खर्च काढून साधारण २ लाख रुपयांचा नफा होईल.
हेही वाचा:खरीप पिकांचे नियोजन कसे कराल ?
ई- मुद्रा लोन साठी आवश्यक कागदपत्रे (Documents required to take an E-Mudra loan )
- अर्ज करणाऱ्यांचे वय साधारण १८ वर्ष ते ६५ वर्ष असणे आवश्यक आहे. अर्ज करणारा व्यक्ती हा भारतीय असावा. अर्जदाराचे बँकेत खाते असावे. बँकेच्या नियमात बसल्यानंतर आपल्याला कर्ज मिळते. बँकेसह आधार लिंक असावा आणि मोबाईल नंबरला आधारसह लिंक करणे आवश्यक आहे.करी आणि राईस पाऊडरचा व्यवसाय- भारत करी आणि राईस पाउडरची मागणी वाढत आहे. तर आपण हा व्यवसाय करु शकता. या व्यवसायासाठी आपल्याकडे १.६६ लाख रुपये असणे आवश्यक आहे. यासाठी बँक ३.३२ लाख रुपयांचे टर्म कर्ज आणि १.६८ लाख रुपयांचे वर्किंग कॅपिटलमधून कर्ज मिळेल.
हेही वाचा:SBI ची ऑफर : व्हॉट्सअप मेसेजनंतर एटीएम येईल आपल्या दाराशी
मुद्रा लोनसाठी बँकेत जाऊन अर्ज भरावा लागेल. बँकेला आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील. तुम्ही सुरु केलेल्या व्यवसायाची माहिती सादर करावी लागेल. यानंतर बँकेने ठरवलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर मुद्रा बँक योजनेद्वारे आपले कर्ज मंजूर केले जाईल. मुद्रा लोन अंतर्गत कोणताही व्याज दर निश्चित केलेला नाही. परंतु सर्वसाधारणपणे मुद्रा कर्जाचा व्याज दर वार्षिक सुमारे १२% आहे.
ई-मुद्रा लोन देणाऱ्या बँकांचे नाव(Names of banks lending e-Mudra loans ) -
स्टेट बँक ऑफ इंडिया ( State Bank of India ), बँक ऑफ बडौदा (Bank of baroda ), विजया बँक(Vijaya Bank ), बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra ) आयसीआयसीआय बँक (ICICI Bank ), एक्सिस बँक (Axis Bank ), येस बँक (Yes Bank ), यूनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India ), पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank), देना बँक (Dena Bank ), आंध्र बँक (Andhra Bank ), आयडीबीआय बँक (IDBI Bank ), फेडरल बँक(Federal Bank )
Share your comments