1. इतर बातम्या

श्राध्द केले की, कावळ्यासच का खाऊ घातले जाते? या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया.

जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ "वड" व "पिंपळ" हे दोनच

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
श्राध्द केले की, कावळ्यासच का खाऊ घातले जाते? या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया.

श्राध्द केले की, कावळ्यासच का खाऊ घातले जाते? या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया.

जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ "वड" व "पिंपळ" हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवांसाठी व जीवांसाठी प्राणवायु उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे.

जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा "मनुष्य" लाऊ शकतो परंतु फक्त "वड" व "पिंपळ" या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त "कावळे"खातात, ( बघा त्यातही म्हटले आहे केवळ कावळेच, इतर कोणताही पक्षी नाही.) तेव्हा त्यांच्या "पोटातच" ही प्रक्रिया सुरु होते आणि ते जेथे "विष्ठा" करतात तेथेच "वड" किंवा "पिंपळ" हे वृक्ष येतात.

या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे फक्त "भाद्रपद" महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना "घराघरातून" पोषक आहार या काळात "प्रत्येक" "सु-संस्कारी" मानवांनीच दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्याच "संतांनी, शास्त्रकारांनी जाणले होते.

आपल्या संस्कृतीतील "ऋषि-मुनि" हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल "विद्वान" होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही "दोनच" झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार "कावळ्यांना" देण्याची प्रथा सुरु करण्यात आली. आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपुरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे ! 

फक्त ती समजून घ्यायची आपली "कुवत" कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं "पितृपक्ष" आला की "कावळ्यावर" टुकार विनोद करून एकमेकाला पाठवण्यातच धन्यता मानतो. प्रत्येक प्रथेमागे जे विज्ञान आहे ते शोधण्याऐवजी त्यावर खिल्ली उडवणे यातच पुरोगामीपणा व अति-सुशिक्षितपणा ज्यांना वाटतो त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, आणि अश्या बालिश बुद्धिच्या लोकांकडे लक्षही न दिलेले बरे

नाही तरी "कोरोनाने" "आँक्सीजन" बद्दलचे महत्त्व समाजाला पटवून दिलेच आहे. 

जर का कावळ्यांना घरा घरातून "पितरांच्या" नावाने खायला नाही मिळाले , तर आपल्या मागील "वंशाचे" नातू+पणतूंचे काय हाल होतील याची कल्पना करा ? कधीच व कुठेही, कोणतेही सरकार "आँक्सीजनची" पुर्व तयारी करा हे सांगणार नाही . हेच "वैज्ञानिक" स्पष्टीकरण वाचल्यावर आपले विचार बदलतील हीच माफक अपेक्षा.

नाहीतर वेळ येईल तेंव्हा पाहू. आज आम्ही "हजारो" रूपये देऊन लाईन मधे दिवस-दिवस ऊभे राहून आँक्सीजन सिलेंडर मिळविलेच . पण भविष्यात नातू-पणतु "लांखो" रूपये देतील ? की करोंडो" देतील ? हे ती वेळच ठरवेल .

 

 Nutritionist & Dietitian

 Naturopathist 

 Amit Bhorkar

 whats app: 9673797495

English Summary: Shraddha said, why only crows are eaten? Let us know the main purpose behind this scientifically Published on: 30 April 2022, 10:31 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters