Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधी प्रकरणी अजित पवारांनी बोलण्याची काय गरज आहे?, तो केवळ सरकार बदलायचा प्रयत्न झाला. पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
एक प्रकारे शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल माहिती असल्याचे कबुल केले आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शरद पवारांना माहिती आहे असे वक्तव्य केले होते.
पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. ते चिंचवडमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
त्यावेळी सरकार बदलायचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्याचा एक फायदा झाला, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली असे पवार म्हणाले. राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर काय झालं ते तुम्ही पाहिलं असेल, असंही पवार म्हणाले.
तुम्हाला या शपथविधीबाबत माहित होते का? असाही प्रसारमाध्यमांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावेळी पवार म्हणाले की, जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? असा सवालही पवारांनी यावेळी केला. राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असा सवालही शरद पवारांनी उपस्थित केला.
रस्त्यावर कांदा आणि द्राक्ष फेकून सरकारचा निषेध; स्वाभिमानीचे आंदोलन
Share your comments