1. बातम्या

रस्त्यावर कांदा आणि द्राक्ष फेकून सरकारचा निषेध; स्वाभिमानीचे आंदोलन

Swabhimani Shetkari Saghtana : शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नासंदर्भात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी-सुरत महामार्गावर (Shirdi-Surat highway)आंदोलन सुरु केलं आहे.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Swabhimani Shetkari Saghtana

Swabhimani Shetkari Saghtana

Swabhimani Shetkari Saghtana : शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. नाशिक जिल्ह्यात या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी-सुरत महामार्गावर आंदोलन सुरु केलं आहे.

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाताखाली वणी येथे आंदोलन सुरु आहे. यावेळी शेतकऱ्यांनी कांदे द्राक्ष रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला. सरकारला जर लोकशाही मार्गाची भाषा समजत नसेल तर अधिवेशनादरम्यान विधानभवनावर कांदे, द्राक्ष आणि जिल्हा बँकेच्या नोटीसा फेकू असा इशारा संदीप जगताप यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीन चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राज्याच्या विविध भागात आंदोलन सुरु आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्ते सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. सरकारने शेतीमालाच्या दरासंदर्भात चुकीची धोरण अवलंबल्याची टीका आंदोलकांनी केली.

कांदा उत्पादक शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहलं पत्र; केलं 'हे' महत्वाचं आवाहन

संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. वणी मध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्ता रोको केल्याची माहिती स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली. सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

पुरंदरच्या अंजीरचा जगात डंका! युवा शेतकऱ्यांच्या कंपनीची मोठी भरारी, थेट हाँगकाँगला निर्यात

English Summary: Protest against the government by throwing onions and grapes streets Published on: 22 February 2023, 12:48 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters