1. इतर बातम्या

मोठी बातमी! संजय राऊतांना अखेर अटक, 16 तासांच्या चौकशीनंतर ईडीची कारवाई

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांना 16 तासांच्या चौकशीनंतर पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी अखेर ईडीने अटक केली आहे. काल संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर ईडीचे पथक पोहोचले होते. यावेळी संजय राऊत यांच्या कुटुंबियाचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले होते.

sanjay raut

sanjay raut

मुंबई: शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत यांना 16 तासांच्या चौकशीनंतर पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी अखेर ईडीने अटक केली आहे. काल संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मैत्री बंगल्यावर ईडीचे पथक पोहोचले होते. यावेळी संजय राऊत यांच्या कुटुंबियाचीही ईडीकडून (ED) चौकशी करण्यात आली. त्यानंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले होते.

पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी (Patra Chaal Land Scams) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money laundering case) ईडीने संजय राऊतला अटक केली आहे. संजय राऊतांना तपासात सहकार्य करत नसल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे आणि त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली आहे. ईडी त्यांना आज विशेष पीएमएलए कोर्टात हजर करणार असून त्याची कोठडी मागणार आहे.

दुसरीकडे, संजय राऊत यांचा भाऊ सुनील राऊत यांनी सांगितले की, ईडीला संजय राऊतांची भीती वाटते, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या मदतीने संजय राऊत यांना पत्रा चाळशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. संजय राऊत यांच्या घरातून ईडीला 11.5 लाख रुपये मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

भावांनो नोकरी काय करताय! हा व्यवसाय करा आणि कमवा लाखों; सरकारही देत आहे कमी व्याजदरात कर्ज

संजय राऊत यांच्याकडून ईडी त्या पैशांची माहिती विचारत आहे, हे पैसे कोणाचे आणि कुठून आले? ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या पैशांशी संबंधित प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकले नाहीत. याशिवाय पत्रा चाळशी संबंधित संजय राऊत यांच्या घरातून अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. ही सर्व कागदपत्रे आणि रोख रक्कम घेऊन ईडीचे पथक ईडी कार्यालयात पोहोचले होते.

भारीच की! मोहरीचे तेल वाढवणार दुधाचे उत्पादन, मिळणार हे अतुलनीय फायदे; जाणून घ्या...

काय आहे पत्रा चाळ प्रकरण

पत्रा चाळ घोटाळा हा मुंबईच्या उपनगरातील गोरेगावच्या सिद्धार्थ नगरचा आहे. हा परिसर पत्रा चाळ म्हणून प्रसिद्ध आहे. हे 47 एकरात पसरलेले असून एकूण 672 घरे आहेत. याच पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पातील हेराफेरी प्रकरणाचा तपास आता ईडीच्या हाती आला आहे. पुनर्वसनाचे कंत्राट गुरु आशिष कन्स्ट्रक्शन लिमिटेड (GACPL) या कंपनीला देण्यात आले होते. मात्र, 14 वर्षे उलटूनही लोकांना घर मिळालेले नाही.

महत्वाच्या बातम्या:
पावसाची बातमी! पुढील ४ दिवस देशातील या भागात पडणार धो धो पाऊस; IMD चा इशारा
नोकरीला करा रामराम! फक्त एकदा गुंतवणूक करा आणि ७० वर्षे या शेतीतून कमवा नफा

English Summary: Sanjay Raut finally arrested Published on: 01 August 2022, 09:49 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters