पोलीस भरतीची प्रक्रिया जुलै-ऑगस्टमध्ये गृह विभागांतर्फे राबवली जाणार आहे. परंतु आता ही भरती प्रक्रिया राबवत असताना थोडासा बदल करण्यात आला असून अगोदर उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला असून त्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
जास्तीत जास्त तरुणांना पोलिस सेवेत संधी मिळावी हा त्यामागचा हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. जर आपण पोलीस भरती चा विचार केला तर दोन वर्षापासून नवीन पदांची भरती झालेले नाही.
2019 मध्ये जाहीर झालेली पाच हजार पदांची भरती प्रक्रिया तब्बल दीड वर्षे चालली. 2020 मध्ये घोषणा केलेल्या पोलीस भरतीला अजूनही मुहूर्त सापडलेला नाही.
ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्यामागे अनेक कारणे आहेत जसे की,गृह विभागाने काही महिन्या अगोदर पोलीस नाईक हे पद रद्द करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेतील बिंदुनामावली पुन्हा बदलावी लागली. दुसरीकडे पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेल्याना पोलीस हवालदार पदी नियुक्ती करताना तेवढ्या जागा रिक्त नाहीत.
त्यामुळे अनेक जणांना त्याच पदावर काम करावे लागत असून या सर्व बाबींमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती पण आता त्या बाबींची पूर्तता झाल्याने पुढील महिन्यात भरती प्रक्रियेला सुरुवात होईल असा विश्वासही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
परंतु त्या अगोदर भरती प्रक्रियेमध्ये लेखी ऐवजी मैदानी चाचणी प्रथम घेण्याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. या मैदानी चाचणीत लांब उडी आणि 100 मीटर धावणे तसेच पुलप्स, गोळा फेक इत्यादीचाचणी उमेदवारांना पार करावे लागणार आहेत.
नक्की वाचा:ग्रामीण डाक सेवेमध्ये नोकरी ची सुवर्ण संधी, अर्जाची शेवटची तारीख आली जवळ
अगोदरही बदलले गेले होते निर्णय
तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी पहिल्यांदा लेखी ऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयात पुन्हा बदल करून पहिल्यांदा लेखी चाचणी घेण्याचा निर्णय झाला.
त्यानंतर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारने भरती पद्धतीत बदल करून सर्वप्रथम मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील तरुणांना पोलीस भरतीत सर्वाधिक संधी मिळेल हा हेतू होता. आता या नियमाची अंमलबजावणी येणाऱ्या भरतीच्या वेळी केली जाणार आहे.
Share your comments