Old Pension Scheme : कर्मचारी वर्ग पुन्हा एकदा खुश झाला आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, ही कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यादरम्यान राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने अखेर जुन्या पेन्शन स्कीमवला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पंजाब राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
'गो रक्षणासाठी' पगारातून आता पैसे होणार कपात; सरकारचा मोठा निर्णय
मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुन्या पेन्शन स्कीमबाबत चर्चा झाली. या बैठकीत अखेर सर्वांच्या संमतीने मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जुन्या पेन्शन स्कीमबाबत निर्णय घेतला. त्यामुळे आता सर्व कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. पंजाजबमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यासाठी अनेकदा आंदोलन करण्यात आली.
कर्मचाऱ्यांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार, सरकारने केली मोठी घोषणा
दरम्यान नव्या पेन्शन योजनेच्या तुलनेत जुन्या पेन्शन योजनेत फायदा आहे. जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांचं भविष्य सुरक्षित असल्याचीही भावना आहे. त्यामुळे आता पंजाब प्रमाणे इतर राज्य सरकारही जुन्या पेन्शनबाबत काय भूमिका घेतात, याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचं लक्ष असणार आहे.
शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, 26 नोव्हेंबरला सरकार विरोधात राज्यभर आंदोलन
Share your comments