सध्या स्मार्टफोनचा काळ असून अगदी समाजातील कुठल्याही घटकाकडे स्मार्टफोन दिसतात. मोबाईल फोन शिवाय जीवन याची कल्पनाच करता येणार नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की, कमीत कमी किमतीमध्ये चांगले वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन मिळावा. अशा व्यक्तींसाठी एक आनंदाची बातमी आहे,
ती म्हणजे असाच एक कमीत कमी किमतीत चांगली वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आला. त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत या लेखात जाणून घेऊ.
कमी किमतीतील स्मार्टफोन आहे Reality C30
Reality इंडिया ने भारतात आपला नवीन एन्ट्री लेवल फोन Realme C30 फोन लॉन्च केला आहे. हा फोन अल्ट्रा स्लिम वर्टीकल स्ट्राईप डिझाईन सोबत येतो.
तसेच Realme C30 फोन बद्दल दावा करण्यात आला आहे की, हा त्याच्या सेगंमेंट मधील सर्वात स्लीम आणि हलका स्मार्टफोन आहे.
नक्की वाचा:Realme Smartphone: 7 हजारात खरेदी करा रियलमीचा 'हा' दमदार स्मार्टफोन, 5000mAh बॅटरी अन….
या फोनचे वजन 182 ग्राम आहे. तसेच या स्मार्टफोनला युनीसॉक T612 प्रोसेसरसह 5000mAh बॅटरीचा सपोर्ट आहे. कंपनीने 45 दिवसांच्या स्टॅन्डबायचा दावा केला आहे.
या स्मार्टफोनमध्ये साडेसहा इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. तसेच तीन जीबी पर्यंत रॅम आणि 32 जीबीपर्यंत स्टोअर उपलब्ध आहे. हा फोन 1.82GHz च्या क्लॉक स्पीड आणि युनीसॉक T612 प्रोसेसर सह उपलब्ध आहे.
या मोबाईलचा 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि पाच मेगापिक्सल प्रंट कॅमेरा असून AI कॅमेरा सपोर्ट आहे.
यामध्ये कनेक्टिव्हिटी ऑप्शन दिली असून साडेतीन मीमी हेडसेट जॅक, मायक्रो यूएसबी, ब्लूटुथ 5.0आणि साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर चा समावेश करण्यात आला आहे.
या फोनची किंमत
Realme C30 चा टू जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज ची किंमत सात हजार 499 रुपये आहे तर थ्री जीबी रॅम सहा 32जीबी स्टोरेजची किंमत आठ हजार 299 रुपये आहे. हा फोन लेक ब्ल्यू, बांबू ग्रीन आणि डेनिम ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध असेल.
नक्की वाचा:फँटॅस्टिक बिझनेस आयडिया: कागदापासून बनवा 'या'निरनिराळ्या वस्तू, कमवा आरामात लाखोंचा नफा
Share your comments