शेतकऱ्याच्या बांधापासून ते टीव्हीवर, सोशल मीडियावर पंजाबरावाच्या (Panjabarao Dakh) यांच्या हवामानाचा अंदाज मात्र बहुतांश वेळा बरोबर ठरला आहे आणि शेतकऱ्यांसाठीसुद्धा फायद्याचा ठरत आहे,असा शेतकऱ्यांचा दावा आहे. निसर्गाच्या संकेतावरून हवामानाचा (Weather Forecast) अचूक अंदाज बांधत असल्याचा दावा पंजाबराव डख करतात. जर तुम्हालाही पाऊस कधी पडणार हे ओळखायचं असेल तर चला जाणून घेऊ..
पंजाबराव यांच्या मते पाऊस येणार हे कसं ओळखायचं ?▪️ पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे जर दिवस मावळताना सूर्याभोवती आभाळ तांबड्या कलरचे दिसलं तर समजून जायचं की पुढील तीन दिवसामध्ये पाऊस येण्याची दाट शक्यता असते.▪️ आजूबाजूच्या प्रदेशात कुठे पाऊस झाला तर हवेत गारवा निर्माण होतो आणि जराशी आर्द्रता वाढते. अशामध्ये आपल्या घरातील लाईटवर किडे, पाकोळ्या (फुलपाखरासारख्या पण छोट्या) जमा होऊ लागले की येणाऱ्या तीन दिवसामध्ये पाऊस पडू शकतो.
▪️ मे नंतरच्या जून महिन्यामध्ये सुरुवातीच्या आठवड्यात म्हणजेच मृग नक्षत्रात जर झाडावरील चिमण्या धुळीत अंघोळ करू लागल्या तर आपण समजू शकतो की पुढील तीन ते चार दिवसांमध्ये पावसाची दाट शक्यता आहे.▪️ जर आपण शेतकरी असाल तर आपल्या पिकाविषयी आपल्याला चांगली माहीती असते. गावरान आंबा जर मोठ्या प्रमाणात पिकला नाही तर अशा परिस्थितीत पाऊस चांगला पडतो. ज्या वर्षी चिंचेला चिंचा जास्त लागतात त्यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असते.
▪️ याशिवाय. जून महिन्यामध्ये सूर्यावर जर तपकिरी रंग आला असेल, असे दिसले की पुढच्या 4 दिवसांमध्ये पाऊस येण्याचं वातावरण तयार होऊ शकते.▪️ तसेच, पंजाबराव डख यांच्या मते, सरड्यानी जर आपल्या डोक्यावर लाल रंग केला की त्याचा अर्थ असा घेऊ शकतो की, आगामी 4 दिवसांमध्ये आपल्या भागात पाऊस पडण्याची शक्यता तीव्र असते. याशिवाय घोरपडी बिळाच्या बाहेर तोंड काढून बसत असतील तर पुढच्या चार दिवसामध्ये पाऊस पडू शकतो असं आपण समजू शकतो.
Share your comments