मुंबई- सोशल मीडियाच्या व्याप्तीमुळे जग एक खेड बनलं आहे. त्यामुळे लोकल उत्पादनांना ग्लोबल पातळीवरील पोहचणे शक्य झाले आहे. सध्या मायेची ऊब देणारी पारंपरिक गोधडी ट्रेंडिंगचा विषय ठरत आहे. अनिवासी भारतीयांसोबत विदेशी नागरिकांना गोधडीचे आकर्षण पहायवास मिळत आहे. बहुराष्ट्रीय ई-कॉर्मर्स (e-commerce) कंपन्यांच्या ऑनलाईन विक्रीच्या प्लॅटफॉर्मवर गोधडी साठी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.
गोधडी (godhadhi) हे कापडाचे तयार केलेले अंथरूण किंवा पांघरूण आहे. जुनी कापडे किंवा कपडे वाया जाऊ नयेत म्हणून ते एकत्र करून आणि धुवून त्याची गोधडी बनवतात. पारंपरिक पद्धतीत गोधडी सुई-दोरा वापरून, सर्व कापडे व्यवस्थित अंथरून छोटे-छोटे टाके घालून शिवली जाते. ती आयताकार असते. त्याच्यावर वेगवेगळ्या रंगाच्या कपड्याने नक्षी काढतात. तिला बाहेरच्या बाजूने कापणीच्या आकाराची नक्षी लावली जाते. गोधडी वर नाव किंवा वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या ही लावतात. शिवणयंत्रावरही गोधड्या शिवता येतात.
विशिष्ट प्रकारची शिवण, कलात्मक कलाकुसर यामुळे गोधडीची अनेकांना भुरळ पडते. विविध रंगी कापडांपासून बनविलेली गोधडी ही महाराष्ट्राचे कलात्मक वैभव आहे.
Share your comments