
symbolic image
घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. कधीकधी बऱ्याचदा मनामध्ये असं वाटते की, जर घर एका जागेहून दुसर्या जागी नेता आले असते तर किंवा अशा कल्पना जमिनीच्या बाबतीतही येतात.
परंतु ही अशक्यप्राय गोष्ट आहे. तसेच घर बांधणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. बांधकाम क्षेत्रातील सगळ्याच प्रकारच्या साहित्याचे दर वाढल्याने घरबांधणी खूपच खर्चिक झाले आहे. परंतु अगदी सर्वसामान्य माणसांना परवडेल आणि अगदी घडी करून तुम्ही कुठेही नेऊ शकतात असे फोल्डिंगचे घर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील प्राध्यापक नितीन दांडेकर यांनी बनवले आहे. वाचुन विश्वास नाही बसला ना? परंतु हे खरे आहे.
नक्की वाचा:सावधान! शेती संपावर जाणार आहे
प्राध्यापकांनी बनवले घडी करता येईल असे घर
प्रा. नितीन दांडेकर हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील आहेत. त्या ठिकाणी त्यांचा स्वतःचं घर आहे. परंतु ते नोकरीसाठी एरंडोल तालुक्यात राहत असल्याने त्यांना घरासाठी एरंडोल मध्ये खूप खर्च करून घर नको होते. त्यासाठी ते घराचा शोध घेत होते आणि यादरम्यानच नाशिक येथील त्यांचे मित्र इंजिनियर आणि आर्किटेक्ट सारंग आणि वैशाली पाटील यांनी अतिशय कमी खर्चात आणि तेही तुमचे काम झाल्यावर सहजपणे तुम्ही त्याची कोठेही ने-आण करू शकतात असे घर तयार करता येऊ शकतो असा सल्ला त्यांना दिला.
यावर खुद्द दांडेकरांचा विश्वास बसला नाही. परंतु सारंग पाटील यांनी अगोदर बनवलेल्या अनेक घरांच्या साईट दांडेकर यांना दाखवल्या. नंतर मग दांडेकर यांनी त्यांच्या घराचं बुकिंग करून घेतली. आत्ता सद्यस्थितीत नितीन दांडेकर यांनी एरंडोल मध्ये दहा बाय सोळा या मापाचं घर बनवून घेतला आहे. तेही अवघ्या एकाच आठवड्यात उभे राहिले. दोन लाखांमध्ये सर्व सोय असलेले घर तयार झाल्याने दांडेकर खूप समाधानी असून त्यांचे घर जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.
नक्की वाचा:हरबरा,सोयाबीन व् गव्हु कुटारा पासुन उत्तम खत
प्राध्यापक नितीन दांडेकर यांनी घराविषयी सांगितलेली माहिती
याविषयी त्यांनी सांगितले की हे घर प्री-फॅब्रिकेटेड प्रकारातील असून मजबूत आहे. अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची अडचण यामध्ये आलेली नसून चोराने ठरवल तर कोणतेही घर चोर फोडू शकतात, तसेच हे घर देखील चोर कटरने फोडू शकतात असेही ते म्हणाले. 600 फूट जागेमध्ये 160 फुटांचे हे घर आहे.
यामध्ये सगळ्या सुविधा देण्यात आल्या असून एक लाख 90 हजार रुपये खर्चाचे हे घर उभे राहिलेले आहे असा त्यांचा दावा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जर वाटेल त्या ठिकाणी घडी करून घेऊन जाता येते आणि किंवा त्याला उचलूनही घेऊन जाता येणार असल्याने माझ्यासाठी हे घर आनंद देणारे ठरले आहे, असे प्राध्यापक दांडेकर यांनी म्हटले आहे.(स्रोत-abp माझा)
Share your comments