संग्रामपूर : तालुक्यातील चिचारी येथिल आदिवासींच्या हडपलेल्या जमीनी पेरण्यासाठी गैरआदिवासी लोकांनी मज्जाव केला असल्याने स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दि.२१ जुन रोजी स्वतः तिफण हाकलत चिचारी शिवारातील हम्मद केदार आदिवासी शेतकऱ्यांच्या शेताची पेरणी केली आहे. राज्यभर गाजत असलेला चिचारी येथिल भुखंड घोटाळा प्रकरणाची शासनाकडून चौकशी चालू असतांना गैरआदिवासी दादागिरीच्या जोरावर आदिवासी शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत.
पेरणीला अडथळा निर्माण करीत होते. प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने प्रशांत डिक्कर यांनी परीणामाची चिंता न करता थेट आदिवासींच्या हडपलेल्या शेतामधे पोहचले आणि तिफण हाकलत शेताची पेरणी केली. यापुढे माझ्या आदिवासी बांधवांना कोणीही नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला तर राज्यभरातील स्वाभिमानीची हजारो कार्यकत्यांची फौज चिचारीत आणणार असल्याचा विश्वास यावेळी आदिवासी बांधवांनसोबत प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना दिला.
तालुक्यातील चिचारी येथिल आदिवासींच्या हडपलेल्या जमीनी पेरण्यासाठी गैरआदिवासी लोकांनी मज्जाव केला असल्याने स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दि.२१ जुन रोजी स्वतः तिफण हाकलत चिचारी शिवारातील हम्मद केदार आदिवासी शेतकऱ्यांच्या शेताची पेरणी केली आहे. राज्यभर गाजत असलेला चिचारी येथिल भुखंड घोटाळा प्रकरणाची शासनाकडून चौकशी चालू असतांना गैरआदिवासी दादागिरीच्या जोरावर आदिवासी शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत. पेरणीला अडथळा निर्माण करीत होते.
प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने प्रशांत डिक्कर यांनी परीणामाची चिंता न करता थेट आदिवासींच्या हडपलेल्या शेतामधे पोहचले आणि तिफण हाकलत शेताची पेरणी केली. यापुढे माझ्या आदिवासी बांधवांना कोणीही नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला तर राज्यभरातील स्वाभिमानीची हजारो कार्यकत्यांची फौज चिचारीत आणणार असल्याचा विश्वास यावेळी आदिवासी बांधवांनसोबत प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना दिला. या सर्व प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने लवकरच आदिवासींच्या जमिनी यांच्या नाव
Share your comments