भारतात अनेक युवा उद्योजक तयार होत आहेत आणि काही उद्योजक बनण्याचे स्वप्न बघत आहेत, पण उद्योजक बनू पाहणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न हे पैशांच्या अभावी पूर्ण होत नाही, पण आता अशा उद्योजक बनू पाहणाऱ्या युवा वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे आता उद्योग उभारण्यासाठी मोदी सरकार तब्बल 10 लक्ष रुपयापर्यंतचे लोन उपलब्ध करून देणार आहे ते पण बिना गॅरंटी आहे ना आनंदाची बातमी.
हे लोन मिळणार आहे पंतप्रधान मुद्रा योजनेद्वारे. पंतप्रधान मुद्रा योजना (Pradhan Mantri Mudra Yojna) ही 8 एप्रिल 2015 ला मोदी सरकारने (Modi Government) अमलात आणली आणि ह्या योजनेला भारतात मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्द प्रतिसाद देखील मिळाला. चला तर मग मित्रांनो सविस्तर जाणुन घेऊया मुद्रा योजनेविषयी.
जर तुम्हाला तुमचा व्यवसाय उभा करायचा असेल तर सरकार तुमच्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनाद्वारे (PMMY) स्वस्त कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. लोन कुठलीही बँक देऊ शकते पण, ह्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेची एक विशेषता आहे ती म्हणजे, ह्या योजनेअतर्गत तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी कुठल्याही हमीशिवाय कर्ज मिळवू शकता म्हणजेच तुम्हाला ह्या योजनेद्वारे बँकेत कुठलीही मालमत्ता गहाण (Mortgage) ठेवण्याचे काही कारण नाही स्वतः सरकार तुमची गॅरंटी घेते. या योजनेअंतर्गत (PMMY), तुम्ही तुमचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी 50 हजार रुपय तसेच जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता.
मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड (MUDRA) ही भारत सरकारने स्थापन केलेली एक नवीन संस्था आहे. ही संस्था सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या गैर-कॉर्पोरेट, बिगर शेती क्षेत्रासाठी उत्पन्न देणाऱ्या उपक्रमांना निधी प्रदान करण्यासाठी बनवण्यात आली आहे. ही संस्था पात्र अर्जदारांना 10 लक्ष पर्यंत प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे लोन देते. ज्या व्यक्तींना कर्ज आवश्यक आहे असे व्यक्ती आपल्या जवळच्या कर्ज देणाऱ्या बँकेत (Bank) अथवा संस्थेत जाऊन अथवा त्यांच्या शाखांशी संपर्क साधू शकतात आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतात किंवा प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी ऑनलाइन देखील अर्ज करू शकतात.
ज्या व्यक्तींना ह्या योजनेसाठी ऑनलाईन अँप्लाय करायचे असेल त्यांनी ऑफिसिअल वेबसाईट वरून अधिकृत अधिसूचना डाउनलोड करा आणि सर्व पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया काळजीपूर्वक वाचा. आम्ही "प्रधानमंत्री मुद्रा योजना" (PMMY) बद्दल आपणांस थोडक्यात माहिती देऊ ह्या माहितीद्वारे आपणांस प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेण्यास सोपे होईल. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत (PMMY) कर्जासाठी तुम्हाला सरकार किंवा बँक शाखेकडे अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला मालकी किंवा भाड्यातत्वावर असलेले दस्तऐवज, कामाशी संबंधित माहिती, आधार, पॅन नंबर आणि इतर अनेक कागदपत्रे द्यावी लागतील.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेत अर्ज करू इच्छिणारे सर्व पात्र अर्जदारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्सचे पालन करा:
प्रधानमंत्री मुद्रा योजनासाठी अँप्लाय कस करणार
»प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजेच www.mudra.org.in ला भेट द्या.
»ह्या अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर तीनही प्रकारच्या कर्जाचा पर्याय उपलब्ध आहे. आपल्याला ज्या कर्जासाठी फॉर्म डाउनलोड करायचा आहे त्या कर्जावर क्लिक करा आणि फॉर्म डाउनलोड करा.
»फॉर्म भरा आणि बँकेत जमा करा!
»बँक तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल काही माहिती विचारेल. जर आपण दिलेली माहिती यथायोग्य असेल आणि आपण कर्ज घेण्यासाठी पात्र असाल तर तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजने (Pradhan Mantri Mudra Yojna) अंतर्गत कर्ज दिले जाईल.
Share your comments