1. इतर बातम्या

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना: शहरी ग्रामिण भागातील गरीब कुटुंबांना मिळणार लाभ

देशांत कोरोना व्हायसरचे (Coronavirus) संकट ठाण मांडून बसले आहे. अशा कठीण परिस्थितीत कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकार विविध योजनांच्या आधारे नागरिकांना ताकद देत आहे. नागरिकांना अधिकचा आर्थिक बोझ येऊ नये यासाठी सरकार आरोग्याच्या विविध योजनांमध्ये सुधारणा करत आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra


देशांच्या नागरिकांवर कोरोनाचे (Coronavirus) संकट ठाण मांडून आहे. अशा कठीण परिस्थितीत कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकार विविध योजनांच्या आधारे नागरिकांना ताकद देत आहे. नागरिकांना अधिकचा आर्थिक बोझ येऊ नये यासाठी सरकार आरोग्याच्या विविध योजनांमध्ये सुधारणा करत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी (Pradhan Mantri Jan Arogya Yojana ) सरकारने दिलेला निधी कोरोना व्हायरसचा उपचारासाठी वापरण्यात येणार आहे. जेणेकरून नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये. यासह आयुष्यमान भारत (Ayushman Bharat ) या योजनेच्या लाभार्थ्यांचाही यात समावेश करण्यात येणार आहे.

आपल्याला न्यूमोनिया, ताप, श्वसनक्रिया इत्यादीसारखे काही विशिष्ट लक्षणे असल्यास, पीएमजेवाय योजनेंतर्गत सरकार मोफत उपचार देईल. या योजनेत मुख्यत्वे गरीब, वंचित ग्रामीण कुटूंब आणि शहरी कामगार कुटुंबांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सामाजिक-आर्थिक जात गणना (एसईसीसी) (Socio-Economic Caste Census (SECC)) २०११ च्या आकडेवारीनुसार या योजनेत देशातील सुमारे ५० कोटी लोक या योजनेचा लाभ घेत आहेत.  या योजनेचा लाभार्थ्यांना कसा फायदा होऊ शकेल याचा एक संक्षिप्त सारांश - या योजनेतून माध्यमिक व तिसऱ्या दर्जातील  रुग्णालयात प्रतिवर्ष, प्रत्येक कुटुंबासाठी ५ लाख रुपयांचे आरोग्य आरोग्य मोफत देण्यात येणार आहे.

या योजनेचा फायदा त्या कुटुंबा होईल जे भागातील सामाजिक-आर्थिक जात गणना २०११ च्या निकषाप्रमाणे शहरी वंचित आहेत. लाभार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक कार्ड प्राप्त होईल, जे देशातील कोठेही स्थित असलेल्या सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही रुग्णालयांमध्ये कॅशलेस पेमेंट्स आणि सेवा देण्यासाठी वापरले जाऊ शकते. या योजनेचा लाभ फक्त प्री-हॉस्पिटलायझेशन आणि पंधरा  दिवसांच्या हॉस्पिटलायझेशन दरम्यान झालेल्या खर्चासाठी होईल. इतकेच नाही तर ओटी याच्या खर्चासह साधरण १,४०० प्रकारच्या प्रक्रियांचा यात समावेश आहे. योजनेंतर्गत, कोविड -१९ (COVID-19 )  च्या उपचाराचा लाभ पात्र लाभार्थींना मोफत मिळू शकेल.

English Summary: Pradhan Mantri Jan Arogya Yojana: Know How Farmers Can Benefit From this Scheme Published on: 14 May 2020, 12:58 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters