भारतामध्ये दरवर्षी असंख्य तरुण पदव्या घेऊन बाहेर पडत आहेत. परंतु त्या प्रमाणात रोजगाराचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे असंख्य तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळते.
त्यातल्या त्यात गेल्या वर्षी पासून कोरोनामुळे अनेक जणांच्या हाताचे काम गेले,अनेकांच्या नोकरीवर गदा आली व या सगळ्या परिस्थितीमुळे बेरोजगारी मध्ये आणखीनच भर पडली. या सगळ्या परिस्थितीत केंद्र सरकारने देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. त्या योजनेचे नाव आहे पंतप्रधान रोजगार सृजन योजना हे होय.
या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनामार्फत आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत जर खनिज, खाद्य, कृषी, अभियांत्रिकी, रसायन आणि वस्त्रोद्योग संबंधित व्यवसाय सुरू करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. तसेच या योजनेअंतर्गत सहकारी संस्था आणि धर्मादाय संस्था यांनाही कर्ज मिळू शकते.
जाणून घेऊया या योजनेविषयी
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी 25 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळेल आणि शहरी भागातील तरुणांना पंधरा टक्के सबसिडी दिली जाईल.संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा टक्के पैसे हे तुमचे स्वतःचे असणे गरजेचे आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेच्या PMEGP या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी PMEGP हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर PMEGP E_Portal या पर्यायावर क्लिक करून ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म ऑफ इंडिव्हिड्युअलमिळवता येईल. या अर्जामध्ये तुम्हाला सर्व तपशील भरावा लागेल.
या योजनेसाठी सर्वात महत्त्वाची अट अशी आहे की, तुम्ही जो काही व्यवसाय करण्याचा विचार केला असेल तो पूर्णपणे नवीन असला पाहिजे म्हणजे तुम्ही अगोदरपासून एखादा व्यवसाय करत असाल आणि त्या व्यवसायात तुम्हाला वाढ करायची असेल तर त्यासाठी पंतप्रधान रोजगार सृजन योजनेतून कर्ज मिळणार नाही. तसेच पूर्वीपासून एखादा सरकारी अनुदानाचा लाभार्थी असेल तर अशा व्यक्तीलाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
Share your comments