Pm Mudra Loan Scheme : मित्रांनो जर तुम्हाला व्यवसाय (Business) करायचा असेल आणि तुमचे हे काम पैशांशिवाय अडले असेल तर आता टेन्शन घेण्याची गरजचं नाही. 2014 मध्ये सत्तेत आलेले मोदी सरकार (Modi Government) अशा अनेक योजना राबवत आहे, ज्यांचा लाभ घेऊन तुम्हाला व्यवसायासाठी (Business News) सहजरीत्या कर्ज मिळू शकणार आहे. असं म्हणण्यापेक्षा लोकांना कर्ज मोठ्या प्रमाणात मिळत आहे.
मित्रांनो व्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच तरुणांना व्यवसाय करणे हेतू प्रोत्साहित करण्यासाठी मोदी सरकारने पीएम मुद्रा कर्ज योजना (Yojana) सुरू केली आहे, ज्याचा लोकांना मोठा फायदा होत आहे. सरकारने सुरु केलेल्या PM मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत आतापर्यंत करोडो लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली गेली आहे.
इतक्या लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळत आहे
आता पीएम मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत व्यवसाय करू इच्छिणारा प्रत्येक व्यक्ती 50,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज (Business Loan) घेऊ शकतो. विशेष म्हणजे या कर्जावर लोकांना अत्यंत स्वस्त व्याज द्यावे लागते.
केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणार्या या पीएम मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यास मोठी मदत होणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सहज सुरू करू शकता. आजच्या या बातमीमध्ये तुम्हाला पीएम मुद्रा योजना, आवश्यक कागदपत्रे, पात्रता अटी, योजनेचे लाभ, योजनेचा उद्देश इत्यादींबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
या लोकांना विशेष फायदा
ज्या लोकांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. मात्र त्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध नाही अशा लोकांसाठी ही योजना निश्चितच एक वरदान सिद्ध होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या लोकांना कर्ज दिले जाते.
अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
पीएम मुद्रा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, योजनेच्या अधिकृत वेबसाइट www.mudra.org.in ला भेट द्या.
तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन कर्जासाठी अर्ज करू शकता.
लाभार्थ्याने लिंकमध्ये एक फॉर्म डाउनलोड करावा. त्यानंतर फॉर्ममध्ये सर्व माहिती भरा.
तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.
जवळच्या बँकेच्या शाखेला भेट द्या.
अशा प्रकारे तुम्ही मुद्रा कर्ज योजनेतून कर्ज मिळवू शकता.
Share your comments