नवी दिल्ली : मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. देशातील ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ९३ हजार कोटी पाठविले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने इतकी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांसाठी दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे. या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०१८ मध्ये केली होती. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्राचे म्हणणे आहे की, यावर्षी नोव्हेंबरपर्यंत एकणू मदतीची रक्कम एक लाख कोटींपेक्षा जास्त होईल, कारण पैसे पाठविण्याचे काम चालू आहे. विशेष म्हणजे कोणताही शेतकरी कधीही नोंदणी करुन या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाकाठी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते.
हेही वाचा : PM Kisan: बा' च्या नावावर जमीन आहे व्हय; मग नाही मिळणार पैसा
गेल्या दीड महिन्यात ८० कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार पाठविण्यात आले आहेत. कोरोना संक्रमण काळातही या योजनेची रक्कम शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरली आहे. हे सर्व पैसे शेतकऱ्यांना डायरेक्ट ट्रान्सफर मार्फत पाठविले जात आहेत. दरम्या या योजनेसाठी आपण घरी बसून ऑनलाईनने अर्ज करु शकतात. याशिवाय आपल्या अर्जात काही बदल करायचे असतील तेही आपण ऑनलाईनने करु शकतो. यासाठी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवरुन करता येणार आहे.
कसा कराल PM Kisan योजनेसाठी अर्ज
आधी तुम्ही अधिकृत संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ यावर जावे. अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर होम पेज ओपन होईल. या होम पेजवर Farmers Corner हा पर्याय दिसेल यात Status of Self Registered/CSC Farmers स्वत: नोंदणी आणि सीएससी च्या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर शेतकरी आपले आधार नंबर, इमेज कोड, कॅच्चा कोड यादी गोष्टी भराव्यात. सर्व माहिती भरल्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करा. यानंतर आपल्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेची सद्य स्थितीची माहिती मिळेल. आपले नाव सुचीमध्ये आहे का नाही हे पाहण्याठी लाभार्थी यादी म्हणजेच Beneficiary list वर क्लिक करावे. यानंतर आपण आपले नाव राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गावाचे नाव भरुन तपासू शकता.
कोणाला नाही मिळत पीएम किसान योजनेचा लाभ
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर शेत जमीन असावी, पण जर तो व्यक्ती कुठे सरकारी नोकरीवर किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असेल तर तो व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसेल. यासह जर व्यक्ती माजी आमदार, खासदार किंवा मंत्री असेल तेही या योजनेसाठी पात्र नसतील. जर अर्ज करणारा व्यक्ती हा परवानाधारक डॉक्टर असेल, अभियंता, वकील, चार्टट अकांउंटट असेल तर तोही या योजनेस पात्र नसेल. यासह जर आपल्या या योजनेच्या लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन असणे आवश्क असते. जर अर्ज कर्त्याच्या नावावर शेतजमीन नसेल तर तो या योजनेस पात्र नसेल.
Share your comments