PM Kisan: बा' च्या नावावर जमीन आहे व्हय; मग नाही मिळणार पैसा

20 August 2020 06:05 PM By: भरत भास्कर जाधव

PM Kisan Samman Nidhi Yojana) पीएम किसान सम्मान निधी योजनेचा सहावा  हप्ता आला आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात.  वर्षभरात तीनवेळा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला जातो.  दरम्यान पीएम मोदी सरकार द्वारे साडेआठ लाख कोटी लाभार्थ्यांना सहावा हप्ता देण्यात आला आहे.  शेतकऱ्यांच्या खात्यात हा पैसा हळूहळू टाकण्यात आला आहे.  पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या लाभ  घेण्यासाठी जमीन आपल्या नावावर असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी कोणते व्यक्ती पात्र आहेत,

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर शेत जमीन असावी, पण जर तो व्यक्ती कुठे सरकारी नोकरीवर किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असेल तर तो व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसेल. यासह जर व्यक्ती माजी आमदार, खासदार किंवा मंत्री असेल तेही या योजनेसाठी पात्र नसतील. जर अर्ज करणारा  व्यक्ती हा परवानाधारक डॉक्टर असेल, अभियंता, वकील, चार्टट अकांउंटट  असेल तर तोही या योजनेस पात्र नसेल. यासह जर आपल्या  या योजनेच्या लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन असणे आवश्क असते.  जर शेत जमीन आजोबांच्या  किंवा शेतकऱ्याच्या वडिलांच्या  नावावर असेल तर योजनेचा लाभ मिळत नाही.

पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या नियमानुसार, जर आपली शेतजमीन ही शेती करण्यायोग्य आहेपण आपण त्याचा उपयोग आपण दुसऱ्या गोष्टीसाठी करत आहात तर आपण या योजनेसाठी पात्र नाहीत.  यासह जर आपल्या कुटुंबातील कोणी सदस्य नोकरी करत असेल तर आपण या योजनेसाठी आपण अपात्र ठरणार.  जर आपण करदाते  असाल तर आपण यासाठी अपात्र ठरू शकता. 

PM Kisan Samman Nidhi Yojana PM Kisan पीएम किसान सम्मान निधी पीएम किसान योजना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना पीएम किसान
English Summary: if the agriculture land on father name then didnt get pm kisan scheme money

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय









CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.