Petrol Diesel Price: देशात महागाईचा (inflation) आलेख वाढतच चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती कमी झाली असल्या तरीही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर काही कमी होताना दिसत नाहीत. आजही पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत.
सरकारी तेल कंपन्यांनी आज शनिवार, २९ ऑक्टोबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. तेल कंपन्यांनी (Oil companies) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न केल्याने सर्वसामान्यांना सलग १५८ व्या दिवशी दिलासा मिळाला आहे. म्हणजेच आजही तेजचे भाव स्थिर आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहेत. सध्या, WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल सुमारे $ 87 आहे आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल सुमारे $ 94 आहे.
यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात (Excise duty) कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे.
यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.
सोने खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी! 10 ग्रॅम सोने 5421 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवीनतम दर...
प्रमुख शहरात पेट्रोल-डिझेलचे दर
सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर विकला जात आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे.
तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
कच्च्या तेलाच्या किमती घटल्या! जाणून घ्या पेट्रोल डिझेलच्या दरात काय झाला बदल?
यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल महागले आहे
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाणून घ्या
पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपीसह सिटी कोड ९२२४९९२२४९ क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक ९२२३१११२२२२ या क्रमांकावर आरएसपी लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HP Price पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या:
पावसाचा पुन्हा अलर्ट! देशातील 10 हून राज्यांना पाऊस झोडपणार; जाणून घ्या हवामानाचा अंदाज
कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! कांद्याच्या भावात सुधारणा; जाणून घ्या कुठे किती मिळतोय दर...
Share your comments