Petrol Diesel Price: देशात इंधनाचे दर (Fuel Price) शंभर रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्याचा परिणाम वाहतूक क्षेत्रावर होत आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमती कडाडल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा परिणाम होत आहे. कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे देशातील नागरिक इंधनाच्या किमती कधी कमी होणार याची वाट पाहत आहेत.
कच्च्या तेलाच्या दरात सतत घसरण (Fall in price) सुरू आहे. मात्र देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची प्रतीक्षा अजूनही सुरूच आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) 121 दिवसांपासून त्यांच्या किमती कमी केल्या नाहीत. तथापि, कच्च्या तेलाच्या किमतीत आज म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी घसरण झाली आहे आणि ब्रेंट क्रूड $ 92 पर्यंत खाली आले आहे.
प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या:
दिल्ली- पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
चेन्नई- पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता- पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
शेतकरी आत्महत्या सत्र सुरुचं! पंतप्रधानांना शुभेच्छा देत शेतकऱ्याची आत्महत्या
नोएडा- पेट्रोल 96.57 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
जयपूर- पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
अजमेर- पेट्रोल 108.43 रुपये आणि डिझेल 93.67 रुपये प्रति लिटर
भोपाळ- पेट्रोल 108.65 रुपये आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर
सरकारने कधी कपात केली:
21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोलच्या किमतीवर 6 रुपये आणि डिझेलच्या किमतीवर 8 रुपयांनी उत्पादन शुल्क कमी केले होते. तेव्हापासून आजतागायत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत, म्हणजेच त्यांच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
राज्यात लम्पीचा कहर! शेकडो जनावरांचा मृत्यू; सरकारकडून मिळणार मदत
तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर कसे तपासायचे-
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज एसएमएसद्वारे कळू शकतात. यासाठी फक्त इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुम्हाला तुमचा RSP कोड माहीत नसेल, तर जाणून घेण्यासाठी या वेबसाइटला भेट द्या https://iocl.com/petrol-diesel-price.
तुम्ही BPCL चे ग्राहक असाल तर तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी RSP<deलर कोड> लिहा आणि ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवा.
महत्वाच्या बातम्या:
सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव घसरले! प्रति 10 ग्रॅम सोने 6880 रुपयांनी स्वस्त
मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत धो धो बरसणार; हवामान खात्याने दिला मुसळधार पावसाचा इशारा
Share your comments