1. इतर बातम्या

Petrol-Diesel Price: दिवाळीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत मोठे अपडेट, पहा नवीनतम दर...

Petrol-Diesel Price: देशात दिवाळीच्या सणाची तयारी जोरदार सुरु आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करून देशवासियांना दिवाळी भेट दिली होती. मात्र यावर्षी केंद्र सरकार देशातील सर्वसामान्यांना पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करून दिवाळी गोड करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
petrol-diesel price today

petrol-diesel price today

Petrol-Diesel Price: देशात दिवाळीच्या सणाची तयारी जोरदार सुरु आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) दरात कपात करून देशवासियांना दिवाळी भेट दिली होती. मात्र यावर्षी केंद्र सरकार देशातील सर्वसामान्यांना पेट्रोल (Petrol) डिझेलच्या दरात कपात करून दिवाळी गोड करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत सतत घसरण होत असताना भारतीय तेल विपणन कंपन्यांनी (Indian Oil Marketing Companies) नेहमीप्रमाणे आज पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले. मात्र, भारतीय तेल कंपन्यांनी रविवारी (१६ ऑक्टोबर) पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत.

अशाप्रकारे आज सलग १४८ वा दिवस आहे जेव्हा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. महागाईच्या आघाडीवर आजही सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 89 पर्यंत वाढली आहे आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 96 च्या जवळ आले आहे.

दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ; अमूलचा मोठा निर्णय

यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात (Excise duty) कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे.

यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली. सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर विकला जात आहे.

त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

पीएम किसानच्या 3 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना धक्का; १२ व्या हफ्त्याचे पैसे अडकले; पहा तुमचे तर नाव नाही ना...

आजची किंमत किती आहे

दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.

मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.

कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.

हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.

बंगळुरू: पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.

तिरुवनंतपुरम : पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.

तुमच्या शहराचे दर याप्रमाणे तपासा

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE पाठवू शकतात. BPCL ग्राहक RSP 9223112222 या क्रमांकावर पाठवू शकतात.

महत्वाच्या बातम्या:
Gold Price Update: सोने खरेदीदारांचे अच्छे दिन! 10 ग्रॅम सोने खरेदी करा 5762 रुपयांनी स्वस्त; फटाफट पहा नवे दर...
सरकार चिन्ह सोडून आमच्याकडे पण लक्ष द्या!! शेतकऱ्यांनी शेतातच केलं अर्धनग्न आंदोलन

English Summary: Petrol-Diesel Price: Big Update on Petrol and Diesel Prices Ahead of Diwali, Check Latest Rates Published on: 16 October 2022, 10:24 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters