1. इतर बातम्या

Today Horoscope: 'या' ५ राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

मंगळवार २६ जुलै रोजी आज चंद्र मिथुन राशीत दिवस रात्र संचार करेल. चंद्राचे हे मार्गक्रमण मिथुन सोबत इतर राशीसाठी लाभदायक राहील. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहील, भाग्याची साथ लाभेल का, जाणून घेऊया आजचं राशिभविष्य..

financial benefits today's horoscope

financial benefits today's horoscope

मंगळवार २६ जुलै रोजी आज चंद्र मिथुन राशीत (Gemini) दिवस रात्र संचार करेल. चंद्राचे हे मार्गक्रमण मिथुन सोबत इतर राशीसाठी लाभदायक (beneficial) राहील. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहील, भाग्याची साथ लाभेल का, जाणून घेऊया आजचं राशिभविष्य (Horoscope)..

मेष: दिवसाची सुरवात द्विधा मनःस्थितीने होईल. इतरांशी वाद होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या गोड बोलण्याने इतरांची मने जिंकू शकाल.

आज आपली मनःस्थिती दोलायमान असल्याने शक्यतो नवीन कार्याची सुरवात करू नये. दुपार नंतर उत्साहित व्हाल. कुटुंबियांशी सुसंवाद साधू शकाल.

वृषभ: आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरवातीस शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर मात्र द्विधा मनःस्थिती झाल्याने आपण महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही.

मिथुन: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. कामे होतील, उत्साह वाढेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा 
Cultivation of jojoba! जोजोबा शेतीतून शेतकरी होणार मालामाल; जाणून घेऊया हे पीक कसे पिकवणार..

कर्क: आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायी आहे. एखाद्या सहलीचा बेत आखू शकाल. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. डोळ्यांच्या विकाराचा त्रास सतावेल. कुटुंबातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल.

सिंह: आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. मित्र व स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. नवीन ओळखींचा भविष्यात व्यापारासाठी लाभ होण्याची शक्यता आहे. प्राप्तीत वाढ होईल.

कन्या: आज आपणास आपल्या व्यवसायात (Business) धनलाभ होईल. दूरवरचे प्रवास करू शकाल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. दुपार नंतर नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नोकरीत मिळालेल्या बढतीमुळे लाभ होईल.

तूळ: आळस व कामाचा व्याप ह्यामुळे मन व्याकुळ होईल. नियोजित वेळेत कार्य पूर्ण करू शकाल. प्रकृतीकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने बाहेरील पदार्थ खाऊ नका. प्रवासात अडचणी येतील.

हे ही वाचा 
Benefit of Cultivation: शेतकऱ्यांनो 'ही' शेती करणार तुमच्या आयुष्याची दिवाळी, जाणून घ्या शेतीबद्दल..

वृश्चिक: आज सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा आनंद लुटाल. कामे अपूर्ण राहातील. प्रवासात अडचणी येतील. आध्यात्म आणि ईश्वरभक्ती ह्यामुळे आपणास मदत होईल.

धनु: आजचा दिवस आनंदी व उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल. आपल्या नियोजनानुसार कामे पूर्ण होतील. अपूर्ण कार्ये तडीस जातील. धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात गोडवा टिकून राहील. अचानक धनलाभ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापार वृद्धी संभवते.

मकर: आज आपणास कष्टाचे अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता धूसरच आहे. तरी सुद्धा कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. प्रकृती उत्तम राहण्यासाठी बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. एखादा आर्थिक लाभ संभवतो.

कुंभ: विद्यार्थी, कलाकार व खेळाडू ह्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ फलदायी (fruitful) आहे. पिता व शासनाकडून काही लाभ होऊ शकेल. खंबीर मनोबलामुळे कार्यपूर्ती होण्यात कोणतीही आडकाठी येणार नाही. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. लेखन- वाचन यांत गोडी वाढेल.

मीन: आजचा दिवस काल्पनिक विश्वात घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा बेत ठरवू शकाल. दैनंदिन कामे आत्मविश्वास व एकाग्रचित्ताने पूर्ण करू शकाल.

महत्वाच्या बातम्या
Petrol-Diesel: पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठे बदल; जाणून घ्या आजचे नवीन दर
Planting vegetables! शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात करा 'या' भाज्यांची लागवड; मिळेल भरघोस उत्पन्न
Fertilizer news; शेतकऱ्यांनो सावधान! खतामध्ये केली चक्क मिठाची भेसळ, चोरांनो कुठं फेडचाल हे पाप..

English Summary: People 5 signs financial benefits today's horoscope Published on: 26 July 2022, 10:00 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters