1. कृषीपीडिया

Cultivation of jojoba! जोजोबा शेतीतून शेतकरी होणार मालामाल; जाणून घेऊया हे पीक कसे पिकवणार..

शेतकरी ठराविक पिके (crop) घेऊन चांगले उत्पादन काढत असतो. आपण एका विशेष शेतीबद्दल माहिती घेणार आहोत त्या पिकाचे नाव आहे जजोबा. जजोबा हे एक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. याच्या लागवडीने शेतकरी (farmers) चांगले उत्पादन घेऊ शकतात.

शेतकरी ठराविक पिके (crop) घेऊन चांगले उत्पादन काढत असतो. आपण एका विशेष शेतीबद्दल माहिती घेणार आहोत त्या पिकाचे नाव आहे जजोबा. जजोबा हे एक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. याच्या लागवडीने शेतकरी (farmers) चांगले उत्पादन घेऊ शकतात.

जोजोबा शेतीबद्दल (Jojoba farming) अनेक शेतकऱ्यांना माहिती नाहीये. जोजोबाची लागवड (Cultivation of Jojoba) मुख्यता तेल काढण्याच्या उद्देशाने केली जाते. त्याच्या तेलामध्ये वॅक्स एस्टर असतात, ज्याचा वापर मॉइश्चरायझर, शाम्पू, केसांचे तेल, लिपस्टिकमध्ये केला जातो.

यासह कंडिशनर, अँटी-एजिंग आणि सन केअर (Sun Care) उत्पादनांमध्येही वापरला जातो. याशिवाय रसायने आणि औषधे बनवण्यासाठीही जोजोबाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे ही शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. या लागवडीतून शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही.

हे ही वाचा 
Heavy Rainfall! पावसाचा जोर वाढला; या जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट जारी


जोजोबा शेतीची लागवड

जोजोबा शेती वाळवंटाशी संबंधित आहे. जोजोबाची मुळे ऍरिझोना, कॅलिफोर्निया आणि मेक्सिकोच्या सोनोरन आणि मोजावे वाळवंटांशी संबंधित आहेत. परंतु भारतात वाळवंटीकरण टाळण्यासाठी थारच्या वाळवंटात जोजोबाची रोपे लावली जातात.

वाळवंट आणि ओसाड जमिनीतही शेतकरी या शेतीची लागवड करू शकतात. विशेष म्हणजे जोजोबाचे झाड 3 ते 5 मीटर उंच वाढू शकते, जे पुढील 150 वर्षे फळ देऊ शकते. महत्वाची गोष्ट म्हणजे जोजोबामध्ये प्रत्येक तापमान सहन करण्याची शक्ती आहे.

हे ही वाचा 
भारीच की! 'या' तंत्रज्ञानाचा वापर करून वाढवा भाजीपाला; कमी वेळेत मिळणार दुप्पट उत्पन्न

भारतातील जोजोबा शेती

जोजोबाला कमी श्रम लागतात व ही शेती (agriculture) भरपूर फायदेशीर ठरू शकते. लागवडीसाठी आणि सिंचनासाठी जास्त काळ लागत नाही. कमी पाण्याच्या प्रदेशात, ओसाड जमिनी आणि वालुकामय भागात त्याची रोपे लावल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. माहितीनुसार भारतातील सुमारे 600 ते 700 हेक्टर जमिनीवर शेतकरी जोजोबा (jojoba) शेती करत आहेत.

यामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी राजस्थानमध्ये सर्वाधिक 400-500 हेक्टर, त्यानंतर गुजरातमध्ये 100 हेक्टर आणि सुमारे 50 हेक्टरवर जोजोबा पिकवत आहेत. कृषी तज्ज्ञांच्या मते पंजाब, हरियाणा, ओरिसा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील शेतकरीही जोजोबाची लागवड करून चांगला नफा कमवू शकतात.

महत्वाच्या बातम्या 
Benefit of Cultivation: शेतकऱ्यांनो 'ही' शेती करणार तुमच्या आयुष्याची दिवाळी, जाणून घ्या शेतीबद्दल..
business Earning: काय सांगता? 'या' व्यवसायातून होतेय महिना 5 लाखांपर्यंत कमाई; एकदा पहाच..
Petrol Diesel Rate: पेट्रोलचे दर पुन्हा स्थिरावले; जाणून घ्या आजचे नवीन दर

English Summary: Farmers benefit Jojoba farming grow crop Published on: 25 July 2022, 05:04 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters