
oppo A17k smartphone
सध्या वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्टफोन बाजारामध्ये लॉन्च होत असून दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल कंपन्यांनी अनेक आकर्षक असे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ग्राहकांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार स्मार्टफोनची निवड करणे सोपे जाणार आहे. मोबाईल निर्मिती क्षेत्रातली ओप्पो कंपनी सगळ्यांना माहिती आहे.
अगोदरच या कंपनीचे अनेक चांगले वैशिष्ट्य असणारे स्मार्टफोन बाजारात आहेत. परंतु या दिवाळीच्या मुहूर्तावर या कंपनीने परवडणारी किंमत आणि अनेक वैशिष्ट्य असलेला ओप्पो A17k हा मोबाईल फोन लॉन्च केला आहे. लेखामध्ये या फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊ.
'ओप्पो A17k' स्मार्ट फोनची वैशिष्ट्ये
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या स्मार्टफोनमध्ये 60Hz चा रिफ्रेश रेटसह 6.56 इंच लांबीचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनचा कॅमेराचा विचार केला तर यामध्ये आठ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देखील देण्यात आला आला आहे.
हा फोन खूप स्लिम असून याची जाडी फक्त 8.29 एमएम असून वजन 189 ग्रॅम आहे. कंपनीने हा फोन अँड्रॉइड बारावर लॉन्च केला असून जो कलर ओएस 12.1 आधारित आहे. जर यामधील प्रोसेसरचा विचार केला तर मीडियाटेक हिलिओ G35 चा देण्यात आला आहे.
या फोनमध्ये सिंगल तीन जीबी रॅम 64 जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. तुम्ही स्टोरेज मायक्रो एसडी कार्ड द्वारे 1TB पर्यंत वाढवू शकतात. उत्तम फोटोग्राफीसाठी सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला असून तो 8 मेगापिक्सेलचा आहे.
उत्तम व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. आपण जर बॅटरीचा विचार केला तर यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ती 10W चार्जिंग उपलब्ध आहे.
सुरक्षेसाठी साईडमाऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.हा फोन दोन रंगांमध्ये उपलब्ध असून गोल्ड आणि नेव्ही ब्लू असे दोन रंगांचे पर्याय यामध्ये आहेत.
या फोनची किंमत
या फोनची किंमत दहा हजार 499 रुपये आहे.
नक्की वाचा:या 5 CNG कार दिवाळीत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध, आत्ताच करा बुक
Share your comments