1. ऑटोमोबाईल

Hero Bike Diwali Offer: अरे वा! शेतकरी बंधूंच्या आवडत्या हिरो कंपनीच्या 'या' बाईकवर मिळत आहे जबरदस्त डिस्काउंट, वाचा डिटेल्स

हिरो मोटोकॉर्प दुचाकी निर्मिती क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण कंपनी असून या कंपनीचे खूप वेगवेगळे प्रकारचे दुचाकींची व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत. आपल्याला माहित आहेच की, हिरो मोटोकोर्पची हिरो स्प्लेंडर ही कंपनीची एक प्रसिद्ध दुचाकी आहे. त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये सगळ्यात लोकप्रिय असून तिची दुसरी हिरो कंपनीची बाईक म्हणजे हिरो एचएफ डीलक्स ही होय.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
deewali offer on hero hf delux bike

deewali offer on hero hf delux bike

हिरो मोटोकॉर्प दुचाकी निर्मिती क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण कंपनी असून या कंपनीचे खूप वेगवेगळे प्रकारचे दुचाकींची व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत. आपल्याला  माहित आहेच की, हिरो मोटोकोर्पची हिरो स्प्लेंडर ही  कंपनीची एक प्रसिद्ध दुचाकी आहे. त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये सगळ्यात लोकप्रिय  असून तिची दुसरी हिरो कंपनीची बाईक म्हणजे हिरो एचएफ डीलक्स ही होय.

जर आपण एचएफ डीलक्स या बाईकचा विचार केला तर ही कंपनीची सर्वात स्वस्त बाईक असून सध्या सणासुदीच्या म्हणजेच दिवाळीच्या मुहुर्तावर ही बाइक स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांसाठी चालून आली आहे. त्यासंबंधी या लेखात माहिती घेऊ.

नक्की वाचा:Keeway Bike: किवेची 'ही' बाईक पहाल तर आठवण येईल यामाहा आरएक्स 100 ची, वाचा या बाईकची वैशिष्ट्य आणि किंमत

काय मिळत आहे ऑफर?

 तुम्हाला या दिवाळीमध्ये हिरो एचएफ डीलक्स बाईक घ्यायचे असेल तर या बाईकवर तीन हजार रुपयांची फेस्टिवल ऑफर मिळत आहे. एवढेच नाही तर कंपनीने या बाईकवर पाच हजार रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट देखील जाहीर केला आहे.

सोबतच ज्या ग्राहकांना ही बाईक फायनान्स करायचे असेल त्यांना दर एक हजार रुपयांच्या कर्जावर  फक्त तीस रुपयांचा ईएमआयचा पर्याय मिळणार आहे. या ऑफरसाठी कंपनीच्या काही नियम आणि अटी लागू असतील. त्यामुळे ग्राहकांनी ही बाईक खरेदी करण्यापूर्वी कंपनीचा डीलरशिप वर जाऊन सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.

हिरो एचएफ डीलक्स बाईकचे काही वैशिष्ट्ये

 हिरो एचएफ डीलक्स बाइकचे दोन व्हेरिएंट आहेत. यामध्ये एक किक स्टार्ट आणि दुसरे सेल्फ स्टार्ट आहे. जर या बाईकच्या वजनाचा विचा

र केला तर किक स्टार्ट बाइकचे वजन 110 किलो व सेल्फ स्टार्ट बाइकचे वजन 112 किलो आहे. या बाईक मध्ये कंपनीने  9.6 लिटर क्षमतेची इंधन टाकी दिलेली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही बाईक 83 किमी प्रति लिटर इतके अवरेज म्हणजेच मायलेज देते.

नक्की वाचा:Bike News: 'Vida' आहे हीरो मोटोकॉर्पची पहिली स्कूटर, एका चार्जवर धावणार 165 किमी

 या बाईक मध्ये 97.2 सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले असून ते एअरकूल्ड, 4stroke सिंगल सिलेंडर ओएचसी इंजिन आहे. या बाईकमध्ये चार स्पीड गिअर बॉक्स ट्रान्समीशन देण्यात आले आहे. बाईक लांबीला 1965 मिलिमीटर आणि रुंदीला 720 मीमी असून उंची 1045 मीमी इतकी आहे.

या बाईकच्या फ्रंट आणि रियर मध्ये एकशे तीस मिमी ड्रम ब्रेक सिस्टम देण्यात आली आहे. तसेच फ्रंटला टेलिस्कोपिक हायड्रोलिक शॉक अब्सोर्बर देण्यात आले आहे. असे आणखी बरीच वैशिष्ट्ये या बाईक मध्ये आहेत.

 या बाईकची किंमत

 या बाईकची दिल्लीतली एक्स शोरूम किंमत साठ हजार एकशे आठ रुपये असून मधील टॉप व्हेरिएंटची किंमत 65 हजार 938 रुपये आहे.

नक्की वाचा:एक रुपयाही भरता, घरी आणा 'ही' बाईक, सोबत मिळेल बरंच काही

English Summary: get so many attractive discount on hero hf delux bike in diwali festive offer Published on: 18 October 2022, 06:46 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters